सोशल मीडियावर आपल्याला दररोज भन्नाट असे फॅशन आणि ब्युटी ट्रेंड पाहायला मिळतात. त्यामध्ये सोशल मीडियावर असंख्य इन्फ्लुएन्सर दररोज घातल्या जाणाऱ्या पोषाखामध्ये काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, मध्यंतरी एका इन्फ्लुएन्सरने चक्क बिस्किटांच्या कागदापासून पर्स बनवून दाखवली होती. तर मध्यंतरी प्रसिद्ध फॅशन ब्रँडने चक्क बूट मोजे घातलेल्या मानवी पायांप्रमाणे दिसणारे बूट बाजारात आणले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे एकापेक्षा एक भन्नाट आणि चित्रविचित्र गोष्टी सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनत असतात. अशातच ‘हाय हिल्स’चा एक नवीन प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये एका मॉडेल ने आपल्या पायात एक विचित्र प्रकारच्या उंच टाचेच्या चपला घातलेल्या पाहायला मिळतात. या चपलांमध्ये किंवा हिल्समध्ये चक्क उंदराचा पिंजरा बसवण्यात आला आहे.

हेही वाचा : लंडनच्या रस्त्यांवर घागरा परिधान करून फिरणाऱ्या तरुणीने फॉरेनर्सना लावले वेड; Video पाहा

इतकेच नाही तर त्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला उंदीर ठेवले असल्याचेदेखील पाहायला मिळते. एक मॉडेल अशा प्रकारच्या चपला घालून फोटोशूट करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. या मॉडेलने काळ्या रंगाचा चष्मा आणि संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. तसेच फोटो काढण्याची जागा ही कचराकुंडीच्या जवळपास असू शकते असा अंदाज व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या एका काळ्या कचऱ्याच्या पिशवीवरून आपण लावू शकतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर inmyseams नावाच्या अकाउंट वरून शेअर झाला आहे. मात्र आता या विचित्र फॅशनबद्दल नेटकऱ्यांचे नेमके काय मत आहे ते पाहू.

एकाने “ते उंदीर खोटे आहेत.. हो ना?” असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्याने, “जरी ते उंदीर खरे नसले तरीही असे कशाला करायचे? हे केवळ मूर्खपणाचे लक्षण आहे.” असे म्हंटले आहे. तिसऱ्याने, “हे काही बरोबर नाही” असे लिहिले आहे. “मी खूप वर्षांपूवी अशा प्रकारचे हिल्स पहिले होते. फक्त त्यामध्ये उंदराच्या पिंजऱ्याऐवजी काचेचा बाउल आणि मासे होते.” अशी आठवण चौथ्याने सांगितली आहे.

हेही वाचा : अरे डोळे दुखले रे! पॉर्नस्टार Johnny Sins रणवीर सिंगबरोबर मालिकेत करतोय काम; मिम्स पाहून व्हाल हैराण

मात्र लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे विचित्र बूट अनकॉमन क्रिएटिव्ह स्टुडिओच्या न्यूयॉर्क ऑफिसने तयार केले आहेत. अशी माहिती न्यू यॉर्क पोस्टने दिली असल्याचे, एनडीटीव्हीच्या एका लेखातून समजते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाला असून आत्तापर्यंत त्याला ११८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of model wearing cage rat high heels for photoshoot went viral on social media netizens are shocked dha