माकड हा प्राणी प्रेक्षणीय स्थळांवर सर्रास दिसतो. कारण पर्यटकांकडे खाण्याचे पदार्थ असतात. अन् हे पदार्थ मिळवण्यासाठी माकडं मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण माकडांच्या फार जवळ जाऊ नका, त्यांना खायला देऊ नका असा सुचना वारंवार दिल्या जातात. माकडाने एका माणसाचा चष्मा पळवून त्याच्या बदल्यात खाण्याची वस्तू कशी मिळवली, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गंभीर असतात तर काही मजेशीर असतात. एका माकडाचा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा भलताच मजेशीर आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पर्यटक पायऱ्यावरुन चढत आहे, त्याचं आजुबाजूला असलेल्या माकडांकडे लक्ष नाहीये. तेवढ्यात पायऱ्यांच्या बाजुला असणाऱ्या कठड्यावर बसलेल्या माकडानं पर्यटकाचा चष्मा पळवला. यामध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओतील व्यक्तीही काही क्षणांसाठी घाबरलेली दिसत आहे. हे सगळं सुरु असताना तिथे एक महिला येते आणि अतिशय चलाकीने माकडाच्या हातातील चष्मा घेते. ही महिला माकडाना एक फळ खायला देते, माकड फळ हातात घेताच, चष्मा खाली ठेवतं, आणि तेवढ्यातच महिला चष्मा उचलते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – फोटो काढायला गेलेल्या तरुणीवर वाघाचा हल्ला, आधी हात पकडला मग पाय…हल्ल्याचा थरारक Video व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या महिलेच्या चलाकीचे नेटकरीही कौतुक करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही माकडाच्या कारनाम्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. माकडे कधी काय करतील काही सांगता येत नाही. कधी ते खाऊ चोरून नेतात, कधी वस्तू चोरतात, कधी हल्ला करतात, असे त्यांचे निरनिराळे रुप आणि व्हिडीओ समोर येत राहतात.