सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी लोकांमधील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी लोक विचित्र गोष्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो. पण, कधी-कधी एखाद्या प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो, ज्यामध्ये तो असे कृत्य करतो ज्यामुळे माणसांची मने जिंकली जातात किंवा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. माकडाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुमचा विश्वास बसणार नाही. माकडानं काय केलं हे आता तुम्हीच पाहा…
माकड हे अत्यंत हुशार, पण तितकंच चतुर आणि खोडकर प्रवृत्तीचा प्राणी आहे. माकडं काही वेळा आपल्या वस्तीत अगदी सहज येतात. घराच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांवर माकडं कशा पद्धतीने येतात हा अनुभव आपणही काही वेळा घेतला असेल. आपल्या घरावर माकडं आली तर आपल्याला एकतर त्यांची भीती वाटते आणि ते घरात घुसू नयेत म्हणून आपण त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. बहुतेकदा तुम्ही माकडांना इकडून तिकडे उड्या मारताना पाहिलं असेल. नाहीतर कधी काही गोष्टींचं, वस्तूंचं नुकसान करताना आणि लोकांना त्रास देताना पाहिलं असेल. मात्र, काही माकडांचं वागणं पाहून अनेकांना ही माकडंही अत्यंत प्रेमळ वाटतात. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमधील एक माकडही असंच काही करताना दिसतं, ज्याची कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल.
(हे ही वाचा : Viral Video: लग्नात चोरी करुन पळत होता चोर, लोकांकडून बेदम मारहाण; घटनेचा Video व्हायरल )
माकडाने काय केलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ चहाच्या दुकानाचा आहे. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची लक्ष तिथे बसलेल्या माकडावर खिळलेली दिसत आहे. पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण माकड तिथे बसून भांडी धुताना दिसत आहे. अगदी माणसांप्रमाणे माकडही भांडी चोळून धुतोय. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडीओ दोन लाख १० हजार लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे.