Viral Video : सासू सुनेचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरी येते, तेव्हा तिचा संपर्क सर्वात जास्त सासूबरोबर होतो. भारतीय टिव्ही सिरीअलमध्ये सासू सुनेचे नात्यात अनेकदा मतभेद दाखवले आहे त्यामुळे या नात्याकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टीकोन वेगवेगळा दिसून येतो. प्रत्यक्षात अनेकदा सासू सुनेचे नाते खूप प्रेमळ आणि घट्ट असते. सासू ही सुनेची अत्यंत जवळची मैत्रीण असते. सोशल मीडियावर सासू सुनेच्या नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम दाखवणारे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सासू आणि सून अफलातून डान्स करत आहे. या दोघींमध्ये भन्नाट जुगलबंदी रंगलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सासू सुनेमध्ये रंगली जुगलबंदी, दोघींनी केला जबरदस्त डान्स (Mother-in-law and Daughter-in-law Dance Video)

हा व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला काही महिला डान्स करताना दिसत असेल पण या सर्वांमध्ये दोघी सासू सुनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सासू सून खूप सुंदररित्या डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. सासू ही सुनेच्या प्रत्येक स्टेप कॉपी करत जोरदार टक्कर देताना दिसत आहे. या दोघींमध्ये रंगलेल्या या जुगलबंदीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)

radhe_bhaiya_1294 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सासू सुनेमध्ये सुरू झाली जुगलबंदी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणीही कोणापेक्षा कमी नाही.. बरोबरीची स्पर्धा” तर एका युजरने लिहिलेय, “सासू अशीच मन मोकळीक ठेवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह, कुटुंब असेल तर असं” एक युजर लिहिते, “मला अशी सासू हवी” तर एका युजरने लिहिलेय, “सासू सुनेच्या नात्यात एवढं प्रेम.. छान” तर एका युजरने लिहिलेय, “नशीबावान आहे सून” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.