Viral Video : आई आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. आई नेहमी मुलाच्या हिताच्या आणि सुखाचा विचार करते. आपल्या मुलांसाठी काय चांगले आहे, त्यांनी आयुष्यात चांगली व्यक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न करते. आई ही मुलांची दुसरी मैत्रीण सुद्धा असते. ती अनेकदा मुलांबरोबर मजेशीर गप्पा मारते. त्यांचे म्हणणे ऐकून घेते, त्यांच्याबरोबर खेळते मजा मस्ती करते आणि वेळ आली तर ती मुलांना रागावते सुद्धा. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आई आणि मुलाचा गोड संवाद दाखवला आहे. मुलाची हेअर स्टाइल बघून आईला कसा संताप येतो, हे तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल.

मुलगा – मम्मी, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स होत आहे तर मी विचार करतोय दही, हळद, तांदळाचे पीठ असं एकत्र करून त्यात व्हिटॅमिन ई ची ती कॅप्सूल टाकून चेहऱ्यावर लावायचं, मी असं बघितलं तर तु करून देशील का मला?

sweet reaction to first dish made by daughter in viral video is pure joy
लेकीचं कौतुक फक्त बापालाच! पहिल्यांदा मुलीने बनवला स्वयंपाक; वडीलांच्या प्रतिक्रियाने जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Elder man speaks in english shared education importance viral video on social media
मराठी माणसाचा नाद करायचा नाय! आजोबांनी विद्यार्थ्यांसमोर झाडलं इंग्रजी, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
Emotional video of a kid selling coconuts from boat hardworking child video viral on social media
जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Viral video of hostel boys put firecrackers in the drum Diwali video went viral on social media
ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्का
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”

आई – तुला ते काहीच करण्याची गरज नाही. तु ते डोक्यावरचं झोपडं आहे ना, झिपऱ्या आहे ना, ते काप. आणि जे तु दही वेगरे सांगतोय ते लावायला जागाच कुठे शिल्लक आहे तुझ्या चेहऱ्यावर. एवढी मोठी दाढी आणि ते.. ते रिकामं कर सर्व..

मुलगा – मी एवढी भारी दाढी ठेवली आहे ना, तुला आवडत नाही..काय गोष्ट आहे ही

आई – हे कमी करायची.. एकदम झिरो आणि केस तर तुझे एवढे मोठे आहे की ते पाहून वाटतं दोन रबर घ्यावं शेंड्या बांधून घ्याव्यात तुझ्या

मुलगा हसतो..

आई – काय अजून हसतोय

मुलगा – मुलींना माझे केस आणि दाढी एकदम आवडतात

आई – तर मुलीपण तुझ्या सारख्याच असतील.

मुलगा – मुली तर मस्त आहे एकदम क्युट क्युट

आई – माझ्यासारखं तर बघणार पण नाही असं.. ती दाढी अन् कटींग.. चांगली बारीक चटक अशी कटींग करावी मस्त.. दाढी करावी.. चांगलं राहावं

मुलगा – बारीक कटींग करण्याचा जमाना गेला ग मम्मी

आई – बारीक कटींग करण्याचा जमाना गेला मला सांगतोय..

या संपूर्ण संवादादरम्यान मुलाला हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : बापरे! सिंहानं तरुणाचा अक्षरश: चेहरा फाडला; गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी पिंजऱ्यात जाणं पडलं महागात, धक्कादायक VIDEO व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

alka_rajput_patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलाची हेअर स्टाइल बघुन आई चा संताप”

हेही वाचा : ‘याला म्हणतात अस्सल लावणी…’ चिमुकलीचा जबरदस्त ठुमका पाहून नेटकरीही झाले शॉक; VIDEO एकदा पाहाच…

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोक्यावरचे झोपडं” तर एका युजरने लिहिलेय, “आईचं ऐक भलं होईल” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय हासतोय दाद्या मम्मी खर बोलतेय” एक युजर लिहितो, “आई साहेब खुप चांगले प्रकारे समजावून सांगितले .” तर एक युजर लिहितो, “सर्व आयांचा हाच प्रॉब्लेम आहे” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader