Viral Video : लावणी हे आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. यामध्ये संगीत, नृत्य आणि गीताचे संयोजन असते. लावणी सादर करताना कलाकार पायात घुंगरू घालतात आणि ढोलकीच्या तालावर हे नृत्य सादर करतात. त्यामुळे हे नृत्य अत्यंत सुंदर आणि उत्साहपूर्ण नृत्य आहे. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यावर डान्स करताना दिसतात. पूर्वी फक्त महिला लावणी सादर करायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी नृत्य सादर करताना दिसतात. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथे दोन तरुण लावणी सादर करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुण लावणी सादर करताना दिसत आहे. “मला पिरतीच्या झुल्यात झुलवा” या लोकप्रिय गाण्यावर ते लावणी नृत्य करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. आजुबाजूचे किंवा मरीन ड्राइव्ह येथे फिरायला आलेली लोक त्यांच्याकडे कौतुकाने बघत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DDo6CgFNVG2/?igsh=MWFwMWE4a3Y0OG55dQ%3D%3D

rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”मला पिरतीच्या झुल्यात झुलवा ही लावणी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली होती एक जुनी आठवण कशी वाटली लावणी ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आमची मुंबई” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर आहे खूप छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात. एकच नंबर” एक युजर लिहितो, “शाळेचे दिवस आठवले मी शाळेत असताना हे लावणी नृत्य सादर केले होते” तर एक युजर लिहितो, “यालाच म्हणतात महाराष्ट्रीयन संस्कृती” अनेक युजर्सनी या व्हिडीओ हार्टचे इमोजी शेअर केले होते.