सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतं तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतं. काही लोक त्यांची कला सादर करतात तर काही लोक भन्नाट ट्रिक सांगून आपल्याला थक्क करतात. सोशल मीडियाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाचा आनंद घेताना दिसून येतात. काही लोक त्यांच्या अवतीभोवतीचे कधी मजेशीर तर कधी थक्क करणारे किस्से शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आज्जीबाई चक्क रॅप गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आज्जीचा जबरदस्त डान्स पाहून कोणीही थक्क होईल. आज्जीने एक नंबर असा डान्स केला आहे.

आज्जीने रॅपवर केला जबरदस्त डान्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तरुणांचा एक ग्रुप दिसेल. या ग्रुपमध्ये काही तरुण रॅप म्हणताना दिसत आहे आणि या रॅपवर डान्स करताना दिसत आहे. पण व्हिडीओत तुम्हाला या तरुणांबरोबर एक आज्जी बाई दिसेल जी जबरदस्त डान्स करताना दिसते. आज्जीचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. साडी नेसलेल्या या आज्जीबाईच्या हातात मोबाईल आणि पिशवी होती. त्यामुळे तिला मनसोक्त डान्स करता येत नव्हता. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आज्जीबाई आपली पिशवी आणि मोबाईल एका तरुणाच्या हातात देते आणि अफलातून डान्स स्टेप्स करत रॅपचा आनंद लुटते. तिच्या डान्स स्टेप्स पाहून कोणीही अवाक् होईल.

एवढंच काय तर पुढे आज्जी बाई खाली बसून सुद्धा डान्स करते. आज्जीचा डान्स पाहून सर्व तरुण थक्क होतात आणि आज्जीला प्रोत्साहन देताना दिसतात. या आज्जीची ऊर्जा पाहून तुम्हालाही आज्जीसारखा डान्स करावासा वाटेल. असं म्हणतात, जगण्याचा आनंद घेण्यासाठी वयाचे बंधन नसते. आज्जीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे खरं वाटेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

whybother या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज्जी इज ए जी. यमुना भगत (@yamunabhagat49 ) हे जिवंत उदाहरण आहे की संगीत आणि कलेवरील प्रेमाचा वयाशी काहीही संबंध नसतो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आज्जी चुकीच्या पिढीत जन्माला आली” तर एका युजरने लिहिलेय, “काय डान्स करते राव..” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज्जी आमच्यापेक्षा जास्त कुल आहे” एक युजर लिहितो, “इन्स्टावरील सुंदर रील” अनेक युजर्सनी आज्जीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दोन लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.