Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ, लोकांमध्ये असलेल्या अनोख्या कला, जुगाड, अनेक नवीन गोष्टी व्हायरल होतात. काही लोक स्वत: आपले व्हिडीओ शेअर करतात तर काही त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या किंवा त्यांनी अनुभवलेल्या काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एका अशा काकांशी संवाद साधत आहे ज्यांना कॅलेंडर काका म्हणून ओळखले जाते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कॅलेंडर काका कोण आहे आणि त्यांना कॅलेंडर काका का म्हणतात? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
काय होत आहे व्हायरल?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण एका काकांबरोबर संवाद साधत आहे.
तरुण – काका तुमचं नाव काय आहे?
काका – गणेश
तरुण – गणेश या काकांचे नाव आहे. पण यांना सर्व जण कॅलेंडर म्हणतात. यांना तुम्ही कोणतीही तारीख विचारा सणाची, ते अगदी बरोबर सांगतात. त्यांना पूर्ण कॅलेंडर पाठांतर आहे.
तरुण – काका, होळी २०२५ ची कधी आहे?
काका – गुरूवार, शुक्रवार
तरुण -दसरा कधी आहे?
काका -ऑक्टोबर महिन्यामध्ये
तरुण – मकरसंक्रांती कधी आहे
काका – जानेवारीमध्ये
तरुण – पोळा
काका -अखरपकापूर्वी(पितृपक्षापूर्वी)
तरुण सांगतो की या काकांना सर्व माहिती आहे. तो पुढे काकांना विचारतो, “तुम्ही इंडिया गॉट टॅलेन्ट का जात नाही?” त्यावर काका स्मित हास्य करतात.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
oops_nagpur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गणेश काका, कॅलेंडर काका. तुम्हाला खूप खूप प्रेम. तुम्हाला आणि तुमच्या टॅलेंटला खूप मोठा सलाम.
या काकांना कॅलेंडरचे सर्व सण त्यांच्या तारखेसह माहिती आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना येत्या वर्षाच्या सर्व तारखा माहिती आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गणेश काकांना मी दोन वर्षांपासून ओळखतो. मंदिरात येतात तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांना मदत करतो. लोकांजवळ यांचे टॅलेंट पोहचले पाहिजे. नागपूरमध्ये किती टॅलेंट आहे. हा व्हिडीओच्या माध्यामातून यांचे नाव मोठे झाले पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “या काकांचे नाव गणेशराव आहे. त्यांना कॅलेंडर म्हणू नका. त्यांना गणेशराव म्हणा”