Viral Video : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येतात. जाहीर सभा असो किंवा कार्यकर्त्यांच्या मेळावा किंवा अगदीच पत्रकार परिषद ते कधी काय बोलतील सांगता येत नाही. काही वेळा त्यांच्या भाषणादरम्यान किंवा एखाद्या भेटीदरम्यान अनेक गमती जमती घडताना दिसतात आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला अजित पवारांसमोर जय श्रीरामचा नारा देताना दिसतो. हा व्हिडीओ त्यांच्या एका भेटीदरम्यानचा आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (video of ncp leader and Deputy Chief Minister ajit pawar reaction when little child shouted as oh dada jay shree ram)

“ओ दादा जय श्री राम…” चिमुकला जोरात ओरडला; पाहा, अजित पवार काय म्हणाले…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला अजित पवारांच्या भोवती कार्यकर्त्यांची गर्दी दिसेल. या दरम्यान एक दांपत्य त्यांना भेटायला आले तेव्हा या दांपत्याबरोबर त्यांचा छोटा मुलगा सुद्धा आला होता. तेव्हा अजित पवारांना पाहून हा चिमुकला जोराने नारा देत म्हणाला, “ओ दादा जय श्री राम” यावर अजित पवार या चिमुकल्याला दाद देत म्हणाले, “अरे बाबा जरा दमाने” आणि एकच हशा पिकला. हा व्हिडीओ पिंपरी चिंचवडमधील आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दादांच्या पुढे सर्वच बिनधास्त असतात…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

अजित पवारांच्या या बिनधास्त स्वभावामुळे त्यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. अनेक तरुण मंडळी अजित पवार यांच्या बोलण्याच्या स्टाइलची हुबेहूब नक्कल करताना दिसतात. मागे अशाच एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले नेता आहेत .

Story img Loader