viral video : आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो.आई होण्याचा आनंद गगनापेक्षाही मोठा असतो.आई होण्यासाठी एका ‘स्त्री’ला किती वेदना सहन कराव्या लागतात. मात्र आपल्या बाळासाठी ती सर्व वेदना हसत हसत सहन करते. ९ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून हे बाळ जगात आल्यानंतर तर आईचा आनंद गगनात मावत नाही. असाच एक आई आणि नवजात बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, जन्मानंतर नवजात मुलगी खूप रडताना दिसली, तिला शांत करण्यासाठी नर्सने तिला तिच्या आईकडे आणले आणि आईने तिचे चुंबन घेतले. आईजवळ जाताच मुलीचेही रडणे थांबले. बाळाने आईच्या गालावर हात ठेवला आहे. नऊ महिन्यानंतर आईची भेट झाली आणि आता आईला सोडायचंच नाही अशा प्रकारे दृश्य या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 9 महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून हे बाळ जगात आल्यानंतर त्या आईला होणारा आनंदही तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

हा व्हिडिओ @instantbollywood ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत ३ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा इमोशनल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुस्तीचा असा डाव कधी बघितलाय का? एका पैलवानानं दुसऱ्याला अवघ्या ४० सेकंदात दाखवलं आस्मान, जंगी कुस्तीचा Video Viral

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ त्यांच्या मुलांशी रिलेट केला आहे आणि त्यांचे अनुभवही शेअर केले आहेत. एका युजरने कमेंट केली, “हा जगातील सर्वात सुंदर क्षण आहे.” आणखी एका यूजरने लिहिले की, “कदाचित म्हणूनच आई आणि मुलाचे नाते इतके मौल्यवान आहे.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, हे पाहून मला माझे दिवस आठवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of newborn baby holding mothers face everyone is shocked to see video viral goes viral netizens in awe srk 1