Viral Video : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या प्रेमाच्या आठवड्यात जगभरातील प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर प्रेमाचे वेगवेगळे दिवस साजरे करताना दिसतात. सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ पाहून अतिशय भावुक करणारे आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपं ऊसाच्या रसाचा गाडा चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. (there is no need of valantine’s day if your love is true video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रेम मनापासून असेल तर व्हॅलेंटाईन डे ची गरज नाही!”

प्रेम ही अशी भावना आहे, जी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपं एकत्र मेहनत घेऊन ऊसाच्या रस विकताना दिसते. आजोबा उसाचा रस काढण्यासाठी मेहनतीने मशीन फिरवताना दिसतात तर आज्जीबाई मशीनमध्ये उस टाकताना दिसत आहे. दोघेही मेहनतीने ऊसाचा रस काढत ग्लासमध्ये भरून ग्राहकांना देत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल की याला खरं प्रेम म्हणतात. या व्हायरल व्हिडीओवर लिहिलेय,” प्रेम मनापासून असेल तर त्याला कोणत्याच डे ची गरज नाही!”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

hanumant_shejval या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बरोबर ना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “निखळ प्रेम कसे असते, हे या आजी आजोबा यांच्याकडे पाहून कळते. चित्रफितीबरोबर निवडलेले स्वरमधुर गाणे अतिशय चपखल साजेसे” तर एका युजरने लिहिलेय, “त्या उसाच्या एक ग्लासापेक्षा आज्जी आजोबांच्या कष्टाची किंमत कितीतरी पटींनी जास्त आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशीब लागते असा जोडीदार भेटायला” एक युजर लिहितो, “किती स्वाभिमानी आहेत दोघेही, या वयात सुध्दा कष्ट करतात” तर एक युजर लिहितो, “खरं सांगू का इतकी प्रेमळ जीव लावणारी माणसं झालं आता ही शेवटची पिढी” अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून भावुर झाले आहेत.