Viral Video : सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरू आहे. हा प्रेमाचा आठवडा जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा प्रेमाचा हा उत्सव एक-दोन दिवस नव्हे तर पूर्ण सात दिवस चालतो. या आठवड्यात आपल्या प्रिय व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त केले जाते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. फुल, पुष्पगुच्छ, चॉकलेट, महागडे गिफ्ट देतात. अशा लोकांसाठी सध्या एक पाटी व्हायरल होत आहे. या पाटीवर व्हॅलेंटाईनला प्रियकर प्रेयसीवर पैसे खर्च करणाऱ्यांसाठी एक मेसेज लिहिला आहे. हा मेसेज वाचून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (video of paati where a young boy told benefit of start sip rather spend money on gf bf watch viral video)
“व्हॅलेंटाईन डे ला GF-BF वर पैसे उडवण्यापेक्षा SIP सुरू करा…”
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण एक पाटी हातात घेऊन भररस्त्यात उभा आहे. सध्या प्रेमाचा हंगाम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी खर्च करणाऱ्या तरुण मंडळीला उद्देशून या तरुणाने या पाटीवर एक मेसेज लिहिला आहे. तरुणाने या पाटीवर लिहिलेय, “व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यापेक्षा SIP सुरू करा, धोका नाही. निदान व्याज तरी खाल.” तरुणाची ही पाटी येणारे जाणारे लोक वाचत आहे. काही लोक या मेसेजला सहमती दर्शवत आहे तर मेसेज वाचून काही लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अजुनही वेळ गेली नाहीये पोरांनो सुधरा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मागच्या फेब्रुवारी पासून सुरू केली आहे” तर एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलेय, “उद्यापासून करतो चालू लगेच” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या मेसेजवर सहमती दर्शवली आहे.