Viral Video : सलीम आणि अनारकलीची प्रेम कहाणी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. यावर आधारित आयकॉनिक चित्रपट ‘मुगल-ए-आजम’सर्वांनी बघितला असेल. १९६० साली प्रदर्शित प्रदर्शित झालेला ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक चित्रपट मानला जातो ज्याने अनेक विक्रम केले. या चित्रपटाचे अनेक गाणे लोकप्रिय झाले होते जे आजही अनेकांच्या ओठांवर असते. यापैकी एक गाणं म्हणजे “प्यार किया तो डरना क्या.” या गाण्यामध्ये अनारकलीची भूमिका साकारणारी मधूबाला सलीमविषयी प्रेम व्यक्त करत अकबरसमोर डान्स करताना दिसते. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं कारण पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी मुगल-ए-आजम चित्रपटातील लोकप्रिय गाण्याला रिक्रिएट केले आहे जे लोकांना खूप आवडत आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हे या चित्रपटातील सर्वात जास्त लोकप्रिय गाणं आहे. या चित्रपटाला सत्तरहून अधिक वर्षे झाली तरी या चित्रपटाची आणि या चित्रपटाच्या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी रिक्रिएट केलं ‘मुगल-ए-आजम’ चं आयकॉनिक गाणं
पाकिस्तानच्या लाहोर येथील एका सरकारी कॉलेज यूनिव्हर्सिटी (GCU) च्या विद्यार्थ्यांनी या आयकॉनिक गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ युनिव्हर्सिटीच्या ड्रामॅटिक क्लबच्या विद्यार्थांनी ‘प्यार किया तो डरना क्या’ या आयकॉनिक गाण्याला रिक्रिएट केले. या व्हिडीओमध्ये अनारकली अकबर समोर डान्स करत सलीमविषयी प्रेम व्यक्त करताना दिसते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना या चित्रपटाची आठवण येईल. भारतीय चित्रपटांविषयी पाकिस्तानात दिसून आलेले प्रेम पाहून भारतीय युजर्स सुद्धा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सगळीकडे या व्हिडीओची एकच चर्चा रंगली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (watch Viral Video)
by_ajwa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “‘मुगल-ए-आजम’माझा आवडता चित्रपट” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर भारतातून खूप प्रेम” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” एक युजर लिहितो, “मला खरंच कन्सेप्ट आवडली.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.