Viral Video : सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कधी कोणी लग्नात गाणी गाताना दिसत आहे तर कधी कोणी लग्नात डान्स करताना दिसत आहे. कधी नवरी नवरदेव उखाणा घेतानाचे व्हिडीओ तर कधी लग्नातील मजेशीर किस्सांचे व्हिडीओ चर्चेत येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भटजी लग्नात सातव्या वचनाचे महत्त्व आणि अर्थ सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भटजी समोर नवरदेव आणि नवरी बसलेले आहेत आणि त्यांच्या अवती भोवती कुटुंबातील लोक आणि इतर नातेवाईक बसलेले आहेत.
भटजी सातव्या वचनाचा अर्थ सांगतात, “कळत नकळत आमच्या कन्येकडून कोणतीही चूक झाली तर हा समाज बसलाय सर्व, यांच्या समोर कधी तिला लाजवू नका. चूक असेल तर तिला एकट्यात घेऊन जा आणि तिला तिची चूक लक्षात आणून द्या. ही तुम्हाला विनंती आहे. जर तुम्ही समाजासमोर ओरडायला सुरू केले. जर तुमची वाणी कठोर झाली तर तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल . ती म्हणते की कळत नकळत माझ्याकडून कोणतीही चुक झाली तर मला माझी चूक लक्षात आणून द्या. कधी समाजासमोर राग व्यक्त करू नका. जर तुम्हाला माझे हे सातवे वचन स्वीकार असेल तर मी तुमच्या घराला राजमहल बनवेल.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा

हेही वाचा : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा सचिनसोबत बेडरुममध्ये धमाकेदार डान्स; VIDEO तुफान व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हिंदू धर्मात लग्नादरम्यान सप्तपदी हा विधी असतो ज्याला सात फेरे किंवा सात वचन म्हणतात. लग्नात वर वधू अग्निच्या साक्षीने हे सात वचन घेतात. या सात वचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील सातव्या वचनाचा अर्थ भटजीने वरील व्हिडीओमध्ये सांगितला आहे.

हेही वाचा : “माझं सर्वकाही आई करते पण मला बाबा आवडतात”; चिमुकलीने स्पष्टच सांगितलं; पाहा Viral Video

quoteslife_in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सातवे वचन नीट लक्ष देऊन ऐका”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अगदी खरंय” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा भटजीने सात वचनाचे महत्त्व सांगायला हवे होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “आमच्याकडे असे पंडित का नसतात?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader