मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं मराठी भाषेवर प्रेम खूप आहे. मराठी भाषेचा इतिहास खूप मोठा आहे. या भाषेची परंपरा, संस्कृती, जपून तिचा आदर करणे आणि जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करणे, हे आपले कर्तव्य आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लोक मराठी भाषेविषयी आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर मराठी भाषेवर आधारीत रिल्स व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिग्नलला मराठी भाषेत आकडे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पनवेल येथील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सिग्नल दिसेल. या सिग्नलवर ‘Stop’ऐवजी ‘थांबा’ असे मराठी भाषेत लिहिले आणि पुढे चक्क मराठी भाषेत आकडे बदलताना दिसत आहे. सिग्नल सुटल्यानंतर ‘जा’ असे मराठीत झळकले आणि पुन्हा मराठी आकडे सुरू झाले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण थक्क झाले. या व्हिडीओवर लिहिलेय, “पनवेलमध्ये सिग्नलला मराठी भाषेत आकडे… आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात झालंच पाहिजे”

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DHkpD4JJwMm/?igsh=aGZ6eHl2OWM1dGx2

shreemant_punekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती मराठी भाषा झालीच पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असे करावे” तर एका युजरने लिहिलेय, “माझी माय मराठी. फक्त मराठी पाहिजे महाराष्ट्रात” आणखी एका युजरने लिहिलेय, “मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मराठी ही आपली पहिली आईच आहे. मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमानच नाही तर गर्व,माज वाटला पाहिजे, नशीब लागतं शिवरायांच्या जन्मभूमीत जन्म घ्यायला आणि हक्काने मराठी माणूस म्हणून जगभर मिरवायला.”

एक युजर लिहितो, “छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र” तर एक युजर लिहितो, “आपला महाराष्ट्र आपली मराठी भाषा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. आतापर्यंत जवळपास एक लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे