Viral Video : हल्ली अनेक जण सोशल मीडियावर त्यांची कला सादर करतात. कोणी चित्रकला तर कोणी संगीत, कोणी नृत्य तर कोणी लेखन कला दाखवतात. या कलेचे नेटकऱ्यांकडून कौतुक सुद्धा केले जाते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला अप्रतिम ढोलकी वादन करताना दिसत आहे. हा चिमुकला मंदिरातील एका किर्तनाच्या कार्यक्रमात ढोलकी वादन करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
हा व्हायरल व्हिडीओ एका मंदिराती आहे. मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे. अनेक लोक खाली बसून या कार्यक्रमात रमलेले दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा चिमुकला स्टेजवर उभा आहे आणि अप्रतिम अशी ढोलकी वाजवत आहे. या चिमुकल्याने अतिशय ठेका धरला आहे तो ऐकून कोणीही थक्क होईल. सोशल मीडियावर सर्वजण या चिमुकल्याचे कौतुक करत आहे.
सर्व वाद्यांची एक वेगळी ओळख आहे. पण काही वाद्ये हे अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात ढोलकी हे वाद्य अतिशय लोकप्रिय आहे ज्याला महाराष्ट्राच्या संगीत आणि नृत्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे स्थान आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
shubham_maharaj_gaykwad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मूर्ती लहान पण कीर्ती महान क्या बात है भैय्या” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माऊली अप्रतिम सुंदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “कलेत जीव ओतावा लागतो तेव्हा हे भयंकर ज्ञान प्राप्ती होते ” एक युजर लिहितो, “याला मानतात असल खानदानी मराठी वारकरी वादक जय हरी माऊली” तर एक युजर लिहितो, “काय विषय आहे भावाचा लोकं किर्तन सोडून मुलाकडेच बघायला लागले. काय चाल आहे ती मूर्ती लहान पण कीर्ती महान” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा या चिमुकल्याचे असे अनेक ढोलकी वाजवतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या चिमुकल्याचे नाव शुभम महाराज गायकवाड असून तो मुळचा परभणीचा आहे.