Viral Video : सध्या छावा चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे . सिनेमा रिलीज झाल्यावर सर्व चित्रपटगृहात लोक सिनेमा बघण्यासाठी गर्दी करताहेत. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफूल आहे. एवढंच काय तर अख्या दोन दिवसात या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर छावा पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. अनेक जण चित्रपटगृहात शिवगर्जना करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा शिवगर्जना करत रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ विकी कौशलसह अनेक लोकांनी सोशल मीडिया शेअर केला होता. आता पुन्हा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओत चित्रपटगृहातील सर्व प्रेक्षक एका चिमुकल्यासह शिवगर्जना करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका चित्रपटगृहातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चित्रपटगृहातील सर्व प्रेक्षक जागेवर उभे आहेत आणि एक चिमुकला शिवगर्जना करताना दिसत आहे. हा चिमुकला अंतःकरणातून शिवगर्जना म्हणताना दिसतो. शिवगर्जना करताना तो भावुक होतो आणि रडायला लागतो. त्यांचा कंठ दाटून येतो आणि मध्येच तो शिवगर्जना करताना थांबतो आणि ओक्साबोक्शी रडताना दिसतो तेव्हा चित्रपटगृहातील इतर प्रेक्षक त्याची शिवगर्जना पूर्ण करतात. या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दिसून येते आणि प्रत्येकाच्या ओठी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणा असतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “तो मराठा कसला जो छावा बघून रडला नाही”

हेही वाचा : बाईईईई! नवऱ्याच्या सगळ्या ब्रँडेड दारुच्या बाटल्या बायकोनं टाकल्या फोडून आणि मग…; VIDEO पाहून डोकंच धराल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : VIDEO: सातारकरांचा नाद करायचा नाय! परिक्षेला उशीर झाला, १५ मिनिटात पेपर अन् घाटात वाहतूक ठप्प; पठ्ठ्यानं कसं गाठलं कॉलेज पाहाच

madhukarrav_patil_3131 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा लिहिल्या आहेत तर काही युजर्सनी ‘जय शिवराय जय शंभु राजे’ लिहिलेय. काही युजर्सनी हार्ट चे इमोजी शेअर केले आहेत . एक युजर लिहितो, “अंगावर काटा आला खरंच” तर एक युजर लिहितो, “अंगावर काटा उभा राहतो, काय ते बलिदान कोणासाठी सोसलं, छत्रपती संभाजी महाराज की जय” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच यार छावा बघून रडू येत..महाराज मुजरा”

Story img Loader