‘पंचायत’ या प्राइम व्हिडिओवरील वेबसिरीज आहे जी लोकांना प्रचंड आवडली होती. काही दिवसांपूर्वीच या वेबसिरीजचा तिसरा भाग प्रसिद्ध झाल्यापासून पंचायत सतत चर्चेत आहे. ‘सचिव जी’ ते ‘फुलेरा गाव’ ते ‘बनारकस’ या शोमधील विविध गोष्टींवरील मीम्सने इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दरम्यान सध्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने वेबसिरीजमधील ‘फुलेरा’ गाव शोधून काढले आहे. ‘पंचायत’ वेबसिरीजमधील फुलेरा गावाचा Video Viral झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये ‘पंचायत’वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेली फुलेरा ग्रामपंचायतचे ऑफिस कार्यालय आणि सर्वाधिक चर्चेत असलेली पाण्याची टाकी या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये गावाचे मूळ नाव महोदिया देखील आहे. ही मालिका प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील महोदिया गावात चित्रित करण्यात आली होती. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना अमित यादव या युजरने लिहिले की, “हा खरा फुलेरा आहे”.
हेही वाचा- बकरीला लागलं या पेयाचं व्यसन! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
ज्यांनी अद्याप मालिका पाहिली नाही त्यांना हे कदाचित गोंधळात टाकणारे असू शकते पण त्यांनी वेबसिरीज पाहिली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडीओ रंजक असू शकतो. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा तरुणाची सचिव म्हणून फुलेरा गावात नियुक्ती होते. शहरातल्या तरुणाचा गावात राहण्याचा संघर्ष, गावकऱ्यांबरोबर त्यांच नातं, सचिव म्हणून काम सांभळण्यापासून अनेक मजेशीर गोष्टी वेबसिरीजमध्ये पहायला मिळतात.
व्हिडिओला 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले कारण अनेक ‘पंचायत’ चाहत्यांनी गावाविषयी कुतूहलामुळे कमेंट्सचा पूर आला. वेबसिरीजमध्ये गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गावकरी सचिव म्हणजे जिंतेंद्र कुमारवर नाराज झाल्याचे दाखवले आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत विचारले, “त्यांनी रस्ता बांधला आहे का?” आणखी एका चाहत्याने कमेंट केली, “हँडपंप गायब आहे”
“हँडपंप कुठे आहे? मला वाटतं भूषण आणि विनोदने(मालिकेत पात्र) चोरले,,” तिसऱ्या चाहत्याने विनोद केला.
हेही वाचा – खळखळ वाहणाऱ्या नदीत सिंहाने मारली उडी अन्…. मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमधील थरारक Video Viral
मध्य प्रदेश पर्यटनाने महोदिया गावात मालिका शुट झाल्याचे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे ज्याचे मूळ शुटींगच्या ठिकाणाभोवतीचा परिसर दाखवला आहे. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल मध्य प्रदेश पर्यटन विभागाने आभार व्यक्त केले.
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, रघुबीर यादव, अशोक पाठक, फैसल मलिक आणि चंदन रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पंचायत’ सीझन१ ३ एप्रिल २०२० रोजी रिलीज झाला होता.