Pune Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जीबाई चक्क ऑटोरिक्षा चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
आपल्या आजुबाजूला असे अनेक लोक असतात जे आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात, नवीन काहीतरी शिकवतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आज्जी बाई दिसेल. ही आज्जीबाई पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ती म्हातारापणात पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवताना दिसत आहे. तरुणांनाही लाजवेल अशी ऊर्जा या आजीबाईमध्ये दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका ऑटोरिक्षेत बसलेल्या प्रवाशाने त्याच्या जवळून जाणाऱ्या जाणाऱ्या रिक्षेतील अतिशय सुंदर दृश्य त्याच्या कॅमेऱ्यात टिपले. त्याला एक आज्जीबाई रिक्षा चालवताना दिसली. त्याने हे कॅमेऱ्यात कैद केले. व्हिडीओत तुम्हाला साडी नेसलेली आज्जीबाई दिसेल. जेव्हा तिला कॅमेरा दिसतो तेव्हा ती स्माइल देते आणि विनम्रपणे हात दाखवते आणि पुढे निघून जाते. हा व्हिडीओ पाहून कोणालाही जगण्याची प्रेरणा मिळेल. या पुणेकर आज्जीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
lalitsasane9000 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या व्हिडिओमध्ये पाहा, कष्टाची खरी ओळख — एक आजीबाई, वयाच्या सायंकाळीही, न थांबता रिक्षा चालवत आहेत. न उन्हाचा विचार, न थकव्याचा — फक्त आत्मसन्मान आणि उदरनिर्वाहासाठीचा संघर्ष! समाजासाठी एक मोठा संदेश देऊन जातात — मेहनत हीच खरी पूजा!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “गरीबी लय वाईट आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “वाह! सलाम या आज्जीला.. असे व्हिडीओ जगण्याची व संघर्ष करण्याची प्रेरणा देऊन जातात. आयुष्य खूप सुंदर आहे.. पण त्यात कुणालाच संघर्ष चुकलेला नाही. तरुणांनी या आज्जीकडून खूप काही शिकावं. जर जिद्द असेल आणि मेहनत घ्यायची इच्छा असेल तर वय कधीही मॅटर करत नाही….” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.