Viral Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी मजेशीर पुणेरी पाट्या, तर कधी येथील प्राचीन मंदिरे, कधी ऐतिहासिक वास्तू तर कधी येथील गमती जमती नेहमी चर्चेत येतात. पुण्यातील ट्रॅफिक हा सुद्धा एक मोठा चर्चेचा विषय आहे. पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे पुणेकरांना दररोज ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. जर तुम्ही एखाद्याला ट्रॅफिक मागील कारण विचारले तर ते एकच उत्तर देतील, “नॉन पुणेकर” अनेक पुणेकरांच्या मते, नॉन पुणेकरांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावे लागते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भयानक ट्रॅफिक दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर भयंकर ट्रॅफिक दिसेल. लोकांच्या गर्दीमुळे चारही बाजूने रस्ता ब्लॉक झालेला दिसत आहे. हा व्हिडीओ सायंकाळी ६-७ च्या दरम्यानचा आहे. व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पाहुणे पुण्याला परतले” पाहुणे हे नॉन पुणेकर लोकांना उद्देशून लिहिलेय जे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी गेले होते.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
akramsaz_asazcustoms या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोण आहेत जे आज ट्रॅफिकमध्ये अडकले होते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुण्याचा बाजार उठवलाय…… भयानक गर्दी असते रोड वर…… रोज ट्रॅफिक जाम….असं वाटतय.. पुण्यामध्ये गर्दीचा virus आलाय..” तर एका युजरने लिहिलेय, “काही तर गणपती पाहायला आलेले इथेच रहायला लागलेत, परत गेलेच नाहीत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या रे या सारे या … पुण्याची सोबत मिळून वाट लावू या. नाहीतर पान टपऱ्या , पीजी, भाड्याची घरं कशी चालणार ?” एक नॉन पुणेकर युजर लिहितो, “अरे आमच्या जीवावरचा पुण्याची अर्थव्यवस्था चालते नाहीतर पुण्याला झीरो किंमत आहे” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिवाळीदरम्यान सुद्धा काही व्हिडीओ समोर आले होते. त्या व्हिडीओमध्ये नॉन पुणेकर गावी गेल्यामुळे पुण्यात सध्या गर्दी नाही, हे दाखवले होते.