Viral Video : उखाणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी, लग्नकार्याच्या वेळी आवडीने उखाणा विचारला जातो. पूर्वी फक्त महिला उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळीसुद्धा उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही उखाणे इतके मजेशीर आणि थक्क करणारे असतात की नेहमीसाठी लक्षात राहतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या लग्नातील किस्सा सांगतो आणि त्याने त्यावेळी घेतलेला मजेशीर उखाणा सुद्धा सांगतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण दिसेल आणि काही नातेवाईक आणि मित्रमंडळीसुद्धा बसलेली दिसत आहे. एक तरुण त्याच्या लग्नातील किस्सा सांगताना दिसत आहे. तो उखाणादरम्यानचा किस्सा सांगताना म्हणतो, “माझ्या सासुरवाडीची लोकं होती त्यावेळी आमच्या मॅडम तर एकदम थाटामाटात म्हणाल्या, नाव घ्या नाव घ्या. त्यात तिने असं नाव घेतलं की सर्वांनी टाळ्या वाजवल्या आता मला म्हणताहेत, हिच्यापेक्षा जास्त मोठं व कडक नाव झालं पाहिजे. त्यावेळी मी नाव घेतलं,
“अवकाशात असंख्य तारे ग्रह उपग्रह, त्यात पृथ्वी हा माझा ग्रह;
पृथ्वीवर असंख्य देश, त्यात भारत हा माझा देश
भारतात असंख्य राज्य, त्यात वीरांचा वीर असा महाराष्ट्र
महाराष्ट्रात असंख्य जिल्हे, त्यात शुरवीर असा पुणे जिल्हा,
जिल्ह्यात असंख्य तालुके, त्यात क्रांतिकारक असा माझा राजगुरूनगर तालुका
तालुक्यात असंख्य गावे त्यात चिखल माझे गाव
चिखल गावात अनेक कट्टे त्यात मुकेवाडी हा माझा कट्टा
नाव घेतो ऋतुजाचं, मुके घराण्याचा पठ्ठा!”
पुणेकर तरुणाचा हा उखाणा ऐकून कोणीही थक्क होईल. सध्या हा उखाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
nilesh.gurav.92505956 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझ्या मित्राने ग्रहापासून तर गावापर्यंत उखाणा घेतला आहे खुप छान संदेश सर.. मित्रा अभिमान आहे तुझा मला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा संदेश आणि वहिनी साहेब” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर नाव घेतलय” तर एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर दादा,खुप खुप खुप भारी..” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाद नाय कराचा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.