Viral Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी येथील पुणेरी पाट्या व्हायरल होतात तर कधी ऑटो रिक्षाच्या मागे लिहिलेले मेसेज व्हायरल होतात. कधी पुणेरी लोकांचे व्हिडीओ चर्चेत येतात तर कधी सार्वजानिक ठिकाणी घडलेले चांगल्या वाईट घटना समोर येतात. पुण्याच्या पीएमटी बस, कंडक्टर आणि ड्रायव्हरचे सुद्धा व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पुणेरी कंडक्टर काका चक्क बस थांबवून प्रवाशांना थंड पाणी बाटलीमध्ये भरून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. या पुणेरी कंडक्टर काकाने दाखवलेल्या माणुसकीला सर्वजण सलाम करत आहे.
सध्या उन्हाळा सुरू आहे. पुण्यातील वातावरण दिवसेंदिवस चांगलेच तापत आहे. अशात उन्हाळ्यात घराबाहेर पडताना स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. या उष्ण तापमानात भरपूर पाणी प्यावंस वाटतं. थंड पाणी प्यायला मिळण, यासारखा दुसरा आनंद कोणता नसतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका बस कंडक्टर काकांनी प्रवाशांना थंड पाणी पिता यावे म्हणून बस थांबवली आहे आणि बाटली भरून प्रवाशांना थंड पाणी देत आहे. या व्हिडीओत तुम्हाला रस्त्यात मध्येच एक पीएमटी बस थांबते आणि कंडक्टर काका बसमधून उतरतात पाणपोईजवळ जाऊन बाटलीत थंड पाणी भरतात आणि बसमध्ये जाऊन प्रवाशाला बाटली देतात. त्यानंतर तिथून बस निघून जाते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रवाशाला पाणी पिता यावे म्हणून कंडक्टरने चक्क अर्ध्या रस्त्यात बस थांबवली, हे पाहून त्यांचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले जात आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “सलाम तुमच्या माणुसकीला”
पाहा व्हायरल व्हिडीओ
season_spaces_pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रात सध्या उन्हाळा तीव्रतेने जाणवत आहे आणि अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर गेलेलं आहे… यातच,समानतेचं प्रतीक: प्रवाशांसाठी कंडक्टरने थांबवलेली बस आणि दिलेले पाणी, मानवतेची खरी ओळख आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बस पुण्याची असली तरी कंडक्टर सांगली सातारा कोल्हापूर चा वाटतोय” तर एका युजरने लिहिलेय, “खुप छान कार्य आहे पुण्य कमवले भाऊंनी” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशा कंडक्टरचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. चालक आणि कंडक्टरसाठी सलाम” अनेक युजर्सनी या कंडक्टरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.