Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास आणि संस्कृती या शहराची ओळख आहे. येथील भाषा, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पेठ्या, पुणेरी पाट्या, खाद्यसंस्कृती अतिशय लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर पुणे शहरासह येथील पीएमटी बस आणि रिक्षाचालकांचे सुद्धा व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका पुणेकर रिक्षाचालकाने सर्वांचे मन जिंकले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या रिक्षाचालकाने नेमकं केलं काय? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

पुण्यातील श्रीमंत रिक्षाचालक! आर्मीसाठी देतात मोफत सेवा (Punes Autorickshaw Driver Who Offers Free Rides to Army Personnel)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रिक्षाचालक दिसेल. या रिक्षाचालकाच्या ऑटो रिक्षेवर मागच्या बाजूला चार अक्षरी सुंदर संदेश लिहिला आहे. या संदेशात लिहिलेय, “आर्मी साठी मोफत सेवा” म्हणजेच हा रिक्षाचालक आर्मीच्या सैनिकांना मोफत सेवा देतो. या रिक्षाचालकाचा हा चांगुलपणा अनेकांना आवडला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “रिक्षावाल्या काकांना १०० तोफांची सलामी”
तुम्ही आजवर अनेक सुंदर संदेश लिहिलेले ऑटो रिक्षा बघितल्या असतील पण ही रिक्षा बघून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sopp_navh_may या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आर्मी साठी मोफत सेवा….!”या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादा सलाम तुमच्या या कार्याला..” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच काकांना मानलं पाहिजे. आर्मीवाले बघितले की प्रत्येक गोष्टीचा रेट वाढवला जातो. त्याच जमान्यात काकाने त्यांच्यासाठी फ्री रिक्षा सेवा सुरू केली” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ सलाम तुझ्या या कार्याला अशी सेवा करत जा देव तुला कधीच कमी पडू देणार नाही” एक युजर लिहितो, “भाऊ तुमच्यासारखे समजूतदारदार राहिले तर नक्कीच एक दिवस भारत देश पुढे जाईल” अनेक युजर्सनी या रिक्षाचालक काकांचे पोटभरून कौतुक केले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.