सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपले मनोरंजन करतात, तर काही आपणाला थक्क करतात. परंतु काही व्हिडीओ असे असतात जे आपणाला विचार करायला भाग पाडता. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अंटार्क्टिकामधील बर्फ वेगाने वितळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत, तर अनेकांनी या व्हिडीओला पर्यावरणाची हानी होण्याशी जोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये अंटार्क्टिकामधील बर्फ वेगाने वितळताना दिसत आहे. बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला तर जीवन जगणं खूप कठीण होऊ शकतं कारण, पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रात हजारो वर्षांपासून साठलेला बर्फ वितळून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जगभरातील किनारपट्टीलगत असलेल्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो, हे आपण अनेकदा ऐकत, वाचत आलो आहोत. अशातच आता वेगाने बर्फ वितळण्याचा व्हिडीओ समोर येताच अनेक नेटकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे.

हेही पाहा- स्वयंपाक करताना बॉम्बसारखा झाला कुकरचा स्फोट, थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद

सोशल मीडियावर व्हायरल होणारा अंटार्क्टिकामधील बर्फ वितळतानाचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. शिवाय बर्फ वितळणं थांबवलं नाही तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं अनेक नेटकरी म्हणत आहेत. यावर व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर TheFigen नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ५ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर तो २० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडीओवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना लिहिलं, “या परिस्थितीला माणसंच जबाबदार आहेत, हे वेळीच रोखलं नाही तर भविष्यात आपणाला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागू शकतो.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of rapid melting of ice in antarctica came out netizens expressed concern after seeing jap
Show comments