Beach viral video: तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या मरीना बीचवर चक्रीवादळाचे राक्षसी रूप पाहायला मिळाले, याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताची असल्याची माहिती आहे. या अनोख्या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये हवेचे तुफान वर्तुळाकार चक्र फिरताना दिसत आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे वादळ संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर नाही तर एका विशिष्ठ भागावर पाहायला मिळालं. यामुळे समुद्र किनाऱ्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरलीय. सुदैवानं या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने उद्ध्वस्त झाली. चक्रीवादळ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण असं वादळ त्यांनी आयुष्यात याआधी कधीच पाहिलं नव्हतं.

High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
Ganpatipule sea
गणपतीपुळे समुद्रात जिंदाल कंपनीचे तिघे बुडाले; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविले
north korea trash balloons
उत्तर कोरियाच्या विष्ठा आणि कचरायुक्त फुग्यांच्या कुरापतींमुळे दक्षिण कोरियातील विमान वाहतूक विस्कळित; कारण काय?
Bhayandar, Cleanliness beach Uttan,
भाईंदर : महापालिकेमार्फत उत्तनच्या समुद्र किनाऱ्याची स्वच्छता, ३ हजार जणांचा सहभाग, ३७ टन कचरा जमा
Worli-Bandra sea bridge, Man Suicide,
मुंबई : वरळी-वांद्रे सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या
lunar eclipse On September 18
अकोला : छायाकल्प चंद्रग्रहणासह सूपरमूनची पर्वणी

मरीना बीचवर चक्रीवादळाचे राक्षसी रूप

एखादे छोटे चक्रीवादळ किनारपट्टीवर खरंच धडकू शकते का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. एका हवामान शास्त्रज्ञाने नंतर स्पष्ट केले की डस्ट डेव्हिल नावाची नैसर्गिक घटना मरिना बीचवर दिसून आली. हे चक्रीवादळ नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे. उलट ही एक नैसर्गिक घटना आहे. त्याला डस्ट डेविल म्हणतात. ही घटना वेळोवेळी घडते, यात नविन काही नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! कारच्या बोनेटमध्ये लपून बसला होता महाकाय अजगर; VIDEO पाहून कार सुरु करताना एकदा नक्की तपासून पहाल…

याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘डस्ट डेव्हील’ एक शक्तीशाली अल्पकालिन चक्रीवादळ आहे. ‘डस्ट डेव्हील’ सामान्यत: हानिकारक नसतात. परंतू काही दुर्मिळ प्रकार संपत्तीलाही नष्ट करु शकतात. ‘डस्ट डेव्हील’ने लोकांना देखील नुकसान झाले आहे. जमिनीजवळील गरम हवेची पोकळी जेव्हा विकसित होते. तेव्हा तिच्यावरील थंड हवेच्या माध्यमाने वेगाने उसळते तेव्हा डस्ट डेव्हील विकसित होते.