School Students Obscene Video Viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणं आता अगदी सामान्य झालं आहे. काही लोक प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशी कृत्यं करतात; तर काहींच्या नकळत असे व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊन, ते व्हायरल केले जातात. अर्थात, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची बदनामी होतेच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळा हे विद्येचे मंदिर मानलं जातं; परंतु आजकाल अभ्यास सोडून विद्यार्थी तेथे थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यात एका शाळेतील दोन विद्यार्थी भरवर्गात एकमेकांबरोबर अश्लील चाळे करताना दिसतायत.

हेही वाचा… बापरे! इमारतीच्या भिंतीवर आपटून नंतर पायाने…, पाहा कशी बनवली जाते सोनपापडी, VIDEO होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेत भरवर्गात युनिफॉर्ममध्ये असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचे आपापसांत अश्लील चाळे सुरू असताना दिसतायत. एकमेकांना मिठीत घेऊन, विद्येच्या मंदिरात त्यांचा अश्लीलपणा सुरू आहे. वर्गात बाकीचे विद्यार्थी असतानादेखील त्यांची ही कृत्यं सुरूच आहेत.

https://www.instagram.com/reel/DAVGETesLAu/?igsh=YWhtMXFuNG1xdDRy

हा व्हायरल व्हिडीओ @reneena_s_khan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला क्लासरूम नाही, तर बेडरूम अशी कॅप्शन दिली गेली आहे. व्हिडीओ अपलोड केल्यापासून आतापर्यंत आठ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे ते अद्याप कळलेलं नाही.

हेही वाचा… जर आई नसती तर…, मुलाचा प्रताप पडला भारी, बेडमध्ये लपला अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “ही तर पब्लिक ओयो रूम वाटतेय.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “ते चुकीचंच करीत आहेत; पण तुम्हीदेखील व्हिडीओ पोस्ट करून चुकीचं करीत आहात.” तिसऱ्यानं, “ही तर हद्दच झाली राव! अजून काय काय बघायला लागतंय काय माहीत”, अशी कमेंट केली.

हेही वाचा… माणूस नाही हैवान! श्वानाच्या शेपटीला बांधला फटाका अन्…, VIDEO चा शेवट पाहून व्हाल निशब्द

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात कधी कोणत्या क्लासमध्ये, तर कधी विद्यापीठामध्ये विद्यार्थी अश्लील कृत्यं करतात आणि मग त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of school students hugging each other in classroom went viral on social media obscene video viral dvr