सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरूण-तरूणी स्कुटीवरून प्रवास करताना दिसून येत आहेत. अचानक त्यांच्या स्कुटीचा अपघात होतो आणि यात ते दोघेही स्कुटीवरून रस्त्यावर पडतात. अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी सावधपणे वाहन चालवणे गरजेचे आहे. असे म्हणतात की रस्त्यावरील अपघात नेहमीच समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे होतात, कारण कोणीही आपली चूक कधीच मान्य करत नाही. नेमंक असंच काहीसं घडलंय या व्हिडीओमधल्या तरूणीसोबत. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी आणि एक तरूण स्कूटीवरून जात असताना अचानक त्यांचा तोल बिघडला आणि ते दोघे रस्त्याच्या मधोमध पडतात. पाठीमागून येणारा बाईकस्वार त्यांच्यापासून थोड्या अंतरावर आपली गाडी थांबवतो आणि घटना पाहू लागतो. मग ती महिला त्या व्यक्तीशी भांडू लागते आणि म्हणते की त्याच्यामुळे स्कुटीचा अपघात घडला. तरूण म्हणतो की, “माझ्या गाडीने स्कुटीला स्पर्शही केला नाही, तर महिलेने उत्तर दिले की ती स्वतःहून पडू शकत नाही! त्यानंतर त्या व्यक्तीने तिला व्हिडीओ दाखवायला. यानंतरही मुलगी त्याच्याशी जबरदस्तीने वाद घालू लागली.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

आणखी वाचा : अतिउत्साह नडला! ‘Cham Cham Cham’ गाण्यावर डान्स करत होती अन् पाय घसरून पडली! पाहा हा VIRAL VIDEO 

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क कासवाने रिबीन कापून यूके विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचे केलं उद्घाटन, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ KumaarSaagar नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ भोपाळमधला असल्याचं सांगण्यात येतंय. सोशल मीडियावर लोक समाधान व्यक्त करत आहेत की त्या व्यक्तीकडे एक कॅमेरा होता ज्यातून ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली होती, अन्यथा तोही खोट्या प्रकरणात अडकला असता. दोन्ही बाजूच्या लोकांनी हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत नेलं नाही. वाद घातल्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गाला निघून गेले. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Story img Loader