द्वेषाची भावना कोणातही जन्मत: नसते. द्वेष करायला ‘शिकवावं’ लागतं. उगाच रागराग करणं, दुसऱ्याला पाण्यात पाहणं त्याच्या वाईटाचा सतत विचार करणं हे काही जन्मत: कोणाला येत नसतं. याउलट प्रेमाची भावना निसर्गत:च आपल्या सगळ्यांमध्ये असते. त्यासाठी वेगळे धडे घ्यावे लागत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेत घडलेल्या एका घटनेने हेच पुन्हा दाखवून दिलं. डोनाल्ड ट्रम्पच्या अमेरिकेत गौरवर्णीय लोकांकडून इतर समाजांवर हल्ले होत असताना आणि वातावरण विद्वेषाने भरलेलं असताना याच समाजातून काही उदारमतवादी आवाजही मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. ‘माणसांच्या प्रती द्वेष मनात असणं वाईट आहे’ ही साधी गोष्ट लहानलहान  मुलांना समजतेय पण वंशवादी विचारांच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना ही साधी बाब सुधरत नाहीये.

याचाच फटका टाॅम काॅटन या रिपब्लिकन सिनेटरला बसला. हा टाॅम काॅटन म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा कट्टर समर्थक आहे. यावरूनच त्याच्या एकंदर विचारसरणीबाबत आपल्याला कल्पना येते.

तर हे काॅटनसाहेब अमेरिकेतल्या एका शहरात एक सभा घेत होते. आपल्या पक्षाच्या विखारी मानसिकतेचा आणखी प्रचार करत असताना प्रेक्षकांमधल्या एका सात वर्षाच्या मुलाने जी प्रतिक्रिया दिली त्याने हे खासदार महोदय भलतेच निरूत्तर झाले

सात वर्ष वय असलेल्या टोबीने माईक हातात घेत बेधडकपणे सांगितलं की मेक्सिकन लोकांविरूध्द आणि स्पॅनिश भाषिक अमेरिकन नागरिकांविरूध्द  ट्रम्प जी गरळ ओकतात ती त्याला आवडत नाही

“मला मेक्सिकन लोक आवडतात, माझ्या आजीलाही ते आवडतात. डोनाल्ड ट्रम्प अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधायच्या गप्पा मारतात. त्यांनी असं काहीही करू नये” टोबीने स्पष्ट शब्दात टाॅम काॅटनला सांगितलं आणि यानंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात वाहून गेलं. दरम्यान टाॅम काॅटनची दातखीळ बसली होती. पाहा या संपूर्ण घटनेचा हा व्हिडिओ

सौजन्य – यूट्यूब

अर्थातच क्षणभर बावचळलेल्या टाॅम काॅटनने स्वत:ला सांभाळलं. शेवटी राजकारणीच तो. टोबीशी गोड बोलतोय असं दाखवत त्याने हळूच “तुला वाटत असेल की जे तू म्हणत आहेस ती मजा आहे पण तसं काही नाहीये” असा त्या मुलावर वैयक्तिक हल्ला करत आपलं म्हणणं पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. पण टोबीच्या स्पष्ट बोलण्याने तिथला नूरच पालटून गेला होता आणि गोल गोल बोलू पाहणाऱ्या टाॅम काॅटनला लोकांनीच गप्प बसवलं.

प्रेम आणि सहिष्णुतेची भावना सर्वव्यापी आहे हेच खरं.