उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी अनेक पत्रकार गावोगावी पोहोचून सर्वसामान्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पत्रकार गावातील लोक सरकारच्या योजनांवर खूश आहेत की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. लोक आता कोणाला मत द्यायचं ठरवत आहेत? एक पत्रकार शामली इथल्या ज्येष्ठांचं मत जाणून घेण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा मात्र त्यांची उत्तरं ऐकून त्याचं डोकं चक्रावून गेलं. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका पत्रकाराने एका आजोबाला प्रश्न विचारला की, “निवडणूक आली आहे, नेते गावात येऊन आश्वासने देत आहेत, मग ते आश्वासन देऊन विसरून जातील का?” याला प्रतिसाद म्हणून हे आजोबा बराच वेळ त्यांचं मत व्यक्त करतात. मात्र, आजोबा जे काही बोलतात, ते कोणालाच समजून येत नाही. काही नेत्यांच्या नावांव्यतिरिक्त,लक्षपूर्वक ऐकल्यानंतर “भाजप सरकार चांगलं आहे” असं आजोबांचं बोलणं समजून येतं.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चिमुरडीच्या हुशारीसमोर आईही हरली, तिने जे केलंय त्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल
आजोबांचं संपूर्ण म्हणणं ऐकून पत्रकार म्हणतो की, “तुम्ही काय बोलताय ते समजावून सांगा ?” यावर ते आजोबा पुन्हा आपलं म्हणणं सांगू लागतात. पण पुन्हा पत्रकाराला काही समजत नाही आणि हे संभाषण तिथेच थांबवतो. आता हा व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
आणखी वाचा : नवरीने नातेवाईकांसोबत केला जबरदस्त भांगडा डान्स, लग्नाचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला? VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल!
हा व्हिडीओ INLD चे मीडिया समन्वयक राकेश सिहाग यांनी शेअर केलाय. ‘पहिल्यांदाच कोणीतरी पत्रकाराला मूर्ख बनवलं आहे.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. श्याम नावाच्या एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, जाटसोबत पंगा घेतला तर डोक्याची दही होणारंच. अमन सैनीने लिहिले की, तुम्ही जे काही बोललात ते ऐकून खूप छान वाटलं. पण काही समजलं नाही. शानू यादव नावाच्या युजरने लिहिले की, “तो कुठे अडकला, असा प्रश्न पत्रकारालाही पडला असेल.”
आणखी वाचा : Panda Video : पांडा पाण्यात खेळतानाचा VIRAL VIDEO पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू
मात्र, जेव्हा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला, त्यानंतर लोकांनी या व्हिडीओची खिल्ली उडवली. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे. आजोबांनी त्याचं नाव उदयवीर राणा असं सांगितलं. यावेळी आजोबा म्हणाले की, त्यांचे आणि भावाचे लग्न झालेले नाही. त्यांची जमीन जप्त करण्यात आली आहे, त्यामुळे ते बहिणीच्या घरी राहतात. उदयवीर राणा म्हणाले की, रेडिओवर वाजवली जाणारी भाषा ऐकत मोठे झाले. या पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी शासनाने मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.