सध्या सगळीकडेच भटक्या श्वानांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या हल्ल्यात अनेक जण जखमीदेखील होतात. अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना या भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून देशात श्वानांची दहशत वाढतच चालली आहे.

सातत्याने श्वानांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. भटक्या श्वानांचे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. अशाच एका श्वानानं चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या हाताचा, मानेचा लचका तोडला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एका रस्त्यावर दोन लहान मुलं सायकलवरून फिरत असतात. तितक्यात अचानक तिथे असलेला एक श्वान एका मुलावर हल्ला करतो, या हल्ल्यामुळे तो चिमुकला सायकलवरून खाली पडतो, तरीही श्वान त्याच्यावर हल्ला करतच राहिला. या व्हिडीओची दुसरी बाजू अजूनही अस्पष्ट आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांचं असं म्हणणं आहे की, लहान मुलाने श्वानाच्या शेपटीवरून सायकल नेल्याने त्याने हल्ला केला असावा. तसंच ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली हेदेखील अद्याप कळलेलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @primezewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “चिमुकल्यावर श्वानाचा हल्ला! हात, खांदा, मानेचे लचके तोडले” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कुठे गेले श्वानप्रेमी, बोला आता काही तरी”, तर दुसऱ्याने “भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ह्याला आळा घातला पाहिजे” अशी कमेंट केली; तर एकाने कमेंट करत लिहिलं, “त्या मुलाने श्वानावर सायकल चढवली म्हणून त्याने असं केलं हे सरळ दिसतंय.”

Story img Loader