कुत्र्यांची गणना जगातील सर्वांत बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. सोबतच ते आपल्या मालकांप्रति अत्यंत निष्ठावानही असतात. हा प्राणी खऱ्या अर्थाने मानवाचा मित्र आहे. कुत्रे आपल्या मालकाचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात. सध्या पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. पावसापासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण छत्रीचा आधार घेतो किंवा जिथे आपण भिजणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी आपण जातो. पण, मग प्राण्यांचे काय? आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे; जो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. नेमके काय घडले ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री व ब्लॉगर आदिती खिंची हिने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मुंबईतील जोरदार पावसात वेस्ट साइड स्टोअरमध्ये एक कुत्रा बसलेला दिसत आहे आणि इतर लोक दुकानात आरामात खरेदी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोक प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे खूप कौतुक करीत आहेत. कारण, रतन टाटा समाजकार्यात तर आघाडीवर असतातच. पण ते प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. त्यांना कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. सोशल मीडियावर त्यांनी याआधी कुत्र्यांसोबतचे अनेक फोटोही पोस्ट केले आहेत. त्याचीच प्रचिती या घटनेनं आली. ज्याचं सोशल मीडियातही कौतुक केलं जात आहे. 

व्हिडीओ पाहून लोक झालेत भावूक

व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “आज मी माझ्या शहरातील @westsidestores येथे या कुत्र्याला पावसात शांतपणे बसलेले पाहिले आणि मला आश्चर्य वाटले. कारण- येथे हे फारसे सामान्य नाही. “कुणीही कुत्रे किंवा मांजरींना त्यांच्या शोरूममध्ये परवानगी देत ​​नाही.” व्हिडीओमध्ये असेही लिहिले आहे, “हेच कारण आहे की, मला रतन टाटा आवडतात. एकच ह्दय आहे सर, तेही तुम्ही किती वेळा जिंकाल?”, असही तिने नमूद केले.

रतन टाटा प्राणीप्रेमी

एक यशस्वी उद्योगपतीसह रतन टाटा हे प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखले जातात आणि त्यांना कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. प्राण्यांना मदत करण्यात रतन टाटा कधीच मागे राहत नाहीत. ते विशेषतः कुत्र्यांवरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. याची आठवण करून देताना अभिनेत्रीने पुढे लिहिले, “मला समजले की, ही टाटा एंटरप्रायझेस आहे आणि तिचे मालक कोण आहेत रतन टाटा सर; तुमचे खूप खूप आभार. मुसळधार पावसात या कुत्र्याला बसण्यासाठी जागा दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार. लोकांमध्ये अजूनही दयाळूपणा आहे.”

येथे पाहा व्हिडीओ

शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ ८.४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्यानंतर या व्हिडीओने इन्स्टाग्राम युजर्सला भावूक केले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “मला आशा आहे की, भारतातील अनेक स्टोअर भटक्या कुत्र्यांसाठी त्यांचे हृदय वाढवतील. दयाळू बनण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of stray dog seeking shelter at mumbai west side store during rain viral pdb