सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कित्येक प्राणीप्रेमी कुत्र्या-मांजराचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका रस्त्यावरील कुत्रीचे चक्क बेबी शॉवर म्हणजेच डोहाळजेवण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. इन्स्टाग्रामवर भरत चंद्रन (@a.bharath_c) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओत बेला नावाच्या (indie dog ) या कुत्रीला नाम लावलेला आणि फुलांचा हार घातल्याचे दिसत आहे. ही क्लिप शेअर करताना चंद्रनने लिहिले, “या व्हिडीओत बेला नावाच्या (Indie Dog ) या कुत्रीला नाम लावलेला आणि फुलांचा हार घातल्याचे दिसत आहे. ही क्लिप शेअर करताना चंद्रनने लिहिलेय, रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्दल तिरस्कार, राग व द्वेषाने भरलेल्या या जगात आम्ही आमच्या बेलाचा वालायकप्पू / बेबी शॉवर साजरा करत आहोत! आशा आहे की तिची सुरक्षित प्रसूती होईल आणि आमच्याकडे खेळण्यासाठी निरोगी व आनंदी लहान पिल्ले असतील. पिल्लांचे लसीकरण करून, त्यांना दत्तक घेण्यासाठी दिले जाईल. प्री-बुकिंग चालू आहे. मागे जेवण चोरणारा माझा रॉकी मुलगा आहे, बेलाचा BFF”.

हेही वाचा – शरद पवार ते बाळासाहेब ठाकरे; महाराष्ट्राच्या नेत्यांचे AI अवतार पाहिले का? अमित वानखेडे यांनी तयार केले भन्नाट AI Photo

या व्हिडीओला ५८,००० हून अधिकांनी पसंती दर्शवली असली तरी अनेकांनी कमेंटसमध्ये भटक्या कुत्रींचे अंडाशय काढून टाकणे (spaying) आणि कुत्र्यांची नसबंदी ( neutering) करण्याचे महत्त्व अधोरेखित केलेय. नसबंदीमुळे (Sterilisation) कुत्र्यांना अनेक प्रकारे फायदा होतो. ते कुत्र्यांना होणाऱ्या कर्करोग यांसारख्या आजारांची शक्यतादेखील कमी करते. नसबंदी केलेले कुत्रे कमी आक्रमक असतात

हेही वाचा – घाबरलेल्या घोड्याने थेट स्विमिंग पूलमध्येच मारली उडी अन्….बचाव कार्याचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिलेय- मी पिल्लांना पाहण्याची वाट पाहत आहे. तसेच कृपया पुढच्या वेळी तिची नसबंदी करून घ्या. दुसर्‍या व्यक्तीने लिहिलेय, ‘तुम्ही जर तिच्यावर प्रेम करत असाल, तर कृपया तिची नसबंदी करा.’ नसबंदीबद्दलच्या एका कमेंटला उत्तर देताना, चंद्रनने लिहिलेय- ‘बेला पळून जाण्यात तरबेज आहे. त्यामुळे तिची नसबंदी करण्याची संधी मिळणे खूप कठीण आहे. परंतु, पिल्लांच्या जन्मानंतर बेलाचे spaying करणे हे आमचे ध्येय आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of stray dogs baby shower goes viral netizens highlight importance of sterilisation snk
Show comments