सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या पायाखालची वाळू सरकते. तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला राग अनावर होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असल्याने त्यांना भिंतीत बंदीस्त केल्याचा व्हिडीओ समोर आहे. प्राणीप्रेमींनी भिंतीत बंदीस्त असलेल्या कुत्र्यांची सुटका केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी अमानुष कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीआड कुत्र्यांना टाकून त्यावर भिंत बांधल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. या घटनेची माहिती प्राणीमित्रांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्यांची सुटका केली. यावेळी व्हायरल व्हिडीओत प्राणीप्रेमींनी घटनेची माहिती दिली आहे. “पौर्णिमा शेट्टी कायम इथे कुत्र्यांना जेवण घालतात. मात्र त्यांना इथले काही लोक त्रास द्यायचे. आता तर सीमा ओलांडली असून भटक्या कुत्र्यांना पकडून एका भिंतीआड बंद केलं आहे. कालपासून हे कुत्रे आत आहेत.”, असं प्राणीप्रेमी लता कुलकर्णी व्हायरल व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. त्यानंतर व्हायरल व्हिडीओत एका भिंतीआड बंदीस्त कुत्र्यांची सुटका करत असल्याचं दिसत आहे. भिंत फोडल्यानंतर यातून काही कुत्र्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत आहेत. नेमका हा व्हिडीओ कुठचा आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.