रणबीर कपूर आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बॉयकॉटच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने नंतर प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ पाडली. या चित्रपटातील व्हीएफएक्सवर तर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. चित्रपटांप्रमाणेच सुरुवातीला चित्रपटातील ‘केसरीया’ या गाण्यालाही खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र हे गाणेही तुफान हिट झाले. विशेष म्हणजे हे गाणे प्रेमींचे ‘लव्ह अँथम’च झाले आहे. सध्या या गाण्याची क्रेझ साता समुद्रापार पाहायला मिळतेय. या संबधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका आपल्या ट्विटर अकाउंटवर अनेक सुंदर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. सध्या त्यांनी ‘केसरीया’ या गाण्याशी संबंधित एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण या गाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पण विशेष म्हणजे हा व्हिडीओ भारतातील नसून लंडन येथील आहे.

सर्वांत आधी व्यायाम कोण करणार? क्षुल्लक कारणावरून जिममध्ये आपापसातच भिडल्या महिला; Video एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक तरुण लंडनच्या एका रस्त्यावरील बाकावर बसला आहे. यावेळी त्याच्या आजूबाजूला इतर तरुण प्रेक्षकांचा गराडा आहे. हा गायक ‘केसरीया’ हे गाणे गायला सुरुवात करतो, यानंतर प्रेक्षकही त्याच्याबरोबर गाणे गाऊ लागतात. हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजने म्हटलंय, “हे गाणे मी आतापर्यंत ऐकलेल्या बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर गाण्यांपैकी एक आहे. मला आशा आहे की हे गाणे तुमच्याही प्लेलिस्टमध्ये नक्कीच असेल.” तर दुसऱ्या युजरने लिहलंय, “चित्रपट आणि संगीत कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय जगभरात फिरू शकतात आणि तरीही प्रत्येकजण त्यावर प्रेम करतात.” आणखी एका युजरने म्हटलंय, “मुंबईपासून दूर लोकांना नाचायला लावणारे सुंदर गाणे. आपल्या गाण्यांमधील जादू हे बॉलीवूड जगभरात लोकप्रिय असण्याचे एक मुख्य कारण आहे.”

जीव वाचवण्यासाठी तब्बल सहा तास फ्रिजमध्ये बसून राहिला अन्…; पाहा नेमकं काय घडलं

अरिजित सिंगच्या आवाजातील हे सुंदर गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तुफान लोकप्रिय ठरले. हे गाणे यंदाच्या टॉप ट्रेंडिंग रोमँटिक गाण्यांपैकी एक असून नेटकरी त्यावर सुंदर रिल्सही बनवताना दिसतात.