Thunderstorm Viral Video : सोशल मीडीयावर दररोज काहीतरी व्हायरल होत असते. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याच वेळी, निसर्गाशी संबंधित काही आश्चर्यकारक व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकीत करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. निसर्गाचे सुंदर दृश्य दाखवणारा हा व्हिडीओ खरोखरच अप्रतिम आहे. निसर्गाने स्वतःमध्ये खूप काही सामावले आहे. आपली पृथ्वी ही निसर्गाची देणगी आहे. अशा स्थितीत जेव्हा-जेव्हा निसर्ग आपले महाकाय रूप दाखवतो, तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. कधी कधी नैसर्गिक देखावे इतके सुंदर असतात की ते अद्भूत असतात.

तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचे सूर्यास्ताचे व्हिडीओ आणि फोटोज पाहिले असतील. पण तुम्ही कधी गडगडाटी वादळानंतरचा सूर्यास्त कधी पाहिलाय का? मग हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल. कारण हे दृश्य इतकं अप्रतिम आहे की त्यावरून आपली नजर हटवताच येत नाही. हा व्हिडीओ अमेरिकेतल्या ग्रँड कॅन्यनमधील आहे. या ठिकाणचा आश्चर्यकारक सूर्यास्त कॅप्चर केला आहे. हा सूर्यास्त होण्यापूर्वी इथे भयंकर गडगडाटी वादळ सुरू होतं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

या व्हिडीओमध्ये तुम्ही वादळाचा गडगडाट पाहू शकता. हे भयंकर वादळ आकाशात घोंगावताना दिसत आहे. वादळाचा हा व्हिडीओ खूपच अप्रतिम आहे. अधूनमधून विजांचा लखलखाट देखील दिसून येतोय. तुम्ही वादळाच्या मागे सूर्याची किरणे देखील पाहू शकता. आकाशात दिसणारे हे दृश्य खरोखर अप्रतिम आहे. हे विजेचे वादळ किमान ४० मैल दूर होते, ज्यामुळे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करणं सुरक्षित होतं. ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

आणखी वाचा : इराणमध्ये मुस्लिम महिला अचानक केस का कापू लागलेत? कारण…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल

“ग्रँड कॅनियन येथे सूर्यास्त पाहण्यासाठी वर्षातील सर्वोत्तम वेळ म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यातला मधला काळ. गडगडाटी वादळे दुपारच्या वेळी कॅनियनवर पसरतात, त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा लखलखाट हे दृश्य अगदी मोहक करतात. यावापाई पॉइंटजवळ जांभळ्या आणि सोनेरी रंगांनी झाकलेल्या आकाशाखाली एक मिनिट घालवा,” असं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिण्यात आलंय.

हा व्हिडीओ २६ सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून या व्हिडीओने आतापर्यंत ५००० हून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या लोकांची संख्याही काही कमी नाही. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Story img Loader