video of tea seller running on a railway platform to serve tea : तुम्ही अनेकदा रेल्वेतून प्रवास केला असेल. या रेल्वेमध्ये अनेक विक्रेते त्यांचे छोटे छोटे व्यवसाय करत असतात. अगदी चहा, वडापाव, चिक्की आदी अनेक पदार्थ ट्रेनमध्ये विकताना दिसतात. पण, अनेकदा असं होतं की, काही व्यापारी हे ट्रेनच्या खिडक्यांतून बिस्किटचे पुडे, तर चहा विकताना दिसतात. त्यामुळे कधी कधी प्रवासी ऑर्डर देतात आणि तेव्हाच नेमकी ट्रेन सुटण्याची वेळ येते. मग अशावेळी ग्राहक व प्रवासी दोघांमध्येही तारांबळ उडते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; यामध्ये चहा विक्रेत्याची त्याच्या ग्राहकांप्रती असलेली अतूट बांधिलकी पाहायला मिळाली आहे.

व्हायरल व्हिडीओ (video) रेल्वे स्थानकाचा आहे. एक विक्रेता रेल्वे स्थानकावर उभं राहून चहा विकत आहे. त्याने चहाचा डबा (कंटेनर) ट्रेनच्या खिडकीवर लटकवला आहे. ट्रेनमध्ये बसलेला प्रवासी चहाची ऑर्डर देतो. पण, तितक्यात ट्रेन सुटण्याची वेळ होते. यादरम्यान प्रवाशाला चहा सुद्धा द्यायची असते. तर यासाठी चहा विक्रेता ट्रेनच्या बाजूने पळताना दिसत आहे. कागदाचे कप हातात घेऊन, ट्रेनला लटकवलेल्या चहाच्या डब्यातून (कंटेनर) तो चहा ओतून खिडकीद्वारे प्रवाशाला देतो आणि वेळीच खिडकीला लटकावून ठेवलेला चहाचा डब्बा (कंटेनर) काढून घेतो. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ…

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

हेही वाचा…‘चल तुला पेट्रोल पंपापर्यंत…’ संतापलेल्या बैलाचा दुचाकीस्वारांवर हल्ला; बाईकला ढकलत नेलं अन्… VIDEO पाहून येईल अंगावर काटा

व्हिडीओ नक्की बघा…

आयुष्य सर्वांसाठी सारखे नसते :

व्हायरल व्हिडीओत (video) तुम्ही पाहिलं असेल की, चहा विक्रेता रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या स्पिडप्रमाणे धावताना दिसत आहे. हातात कागदाचे कप तर ट्रेनच्या खिडकीवर चहाचं कंटेनर लटकवलेलं दिसत आहे. मग कपात चहा टाकण्यासाठी तो कंटेनर उघडतो. तो लवकरच आत बसलेल्या प्रवाशाला चायचा कप देतो आणि ट्रेनचा वेग वाढण्यापूर्वी कंटेनर पुन्हा स्वतःकडे परत घेतो. ट्रेन आधीच स्टेशनच्या आवारातून निघायला सुरुवात झाली असतानाही ग्राहकाला चहा देणारा आणि ग्राहकाचे सुट्टे पैसे प्रामाणीकपणे परत देणाऱ्या विक्रेत्याचे कौतुक करावं तेवढं कमी आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @abdul__hakeeb313 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आयुष्य सर्वांसाठी सारखे नसते” ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्या व्यक्तीसं ‘कष्टकरी वडिल म्हणत आहेत’ तर एक युजर म्हणतोय की, ‘उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांचा आदर करा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्यतीचे व्यवसायाबद्दलचे समर्पण पाहून अनेक नेटकरी प्रभावित झाले आहेत ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader