कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे. कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. म्हणून माणूस आवडीने कुत्रा पाळतो. त्याला घरच्या सदस्याप्रमाणे वागवतो. त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो. याची परतफेड म्हणून कुत्रा सुद्धा त्याच्या मालकाबरोबर अत्यंत प्रामाणिक असतो. एवढंच काय तर मालकाचा जीव वाचवण्यासाठी अनेकदा कुत्र्‍याने स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. माणसाचा संरक्षक आणि घराचा रक्षक म्हणून कुत्रा महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक जण आवडीने कुत्रा पाळतात त्याची काळजी घेतात. त्याला लहानाचं मोठं करतात पण सध्या एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही संताप येईल. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मालक त्याच्या कुत्र्याबरोबर अत्यंत क्रुरपणे वागला आहे. चालत्या गाडीतून कुत्र्याला उतरवत भर रस्त्यात त्याला एकटं सोडलं. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका हायवे वरील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चारचाकी गाडी जात आहे. या चारचाकी गाडीच्या मागे कु्त्रा पळताना दिसतोय. या चारचाकी गाडीतून मालकाने कुत्र्याला खाली उतरलं आणि हायवे वर एकटं सोडून पुढे निघून गेला. कुत्र्याला वाटलं त्याला खेळायला घेऊन आलाय. त्यामुळे कुत्रा गाडीच्या मागे धावताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

ant_asti_prarambh_1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चालत्या गाडीतून उतरून दिलं.त्याला वाटलं मला खेळायला घेऊन आलाय”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती वाईट माणसं असतात. लायकी नाही त्यांची एक मुका प्राणी सांभाळायची” तर एका युजरने लिहिलेय, “त्याला त्याच्या कर्माची फळे मिळतील, नाही सांभाळायचं तर कोणाला तरी द्यायचं ना” आणखी एका युजरने लिहिलेय, “शेवटी कर्माचा हिशोब नक्कीच होणार” एक युजर लिहितो, “कर्म चुकणार नाही यांना” तर एक युजर लिहितो, “अरे रे. किती कठोर मन असेल. बिचारा धावतोय गाडीच्या मागे. असं करण्यापेक्षा कोणालातरी दयायचा ना” अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.