सध्या सोशल मीडियावर वंदे भारत एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबई सर्कलचे डेप्युटी सीपीआय अभिनाश तुताडे हा रेल्वे अधिकारी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहेत. मात्र तो ट्रेनमध्ये चढत असताना अचानक दरवाजा बंद झाल्यामुळे अपघात घडला आहे.

या अपघातामध्ये रेल्वे अधिकारी अभिनाश हा सुदैवाने ट्रेनखाली जाण्यापासून थोडक्यात बचावला आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला होता, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, “सीपीआय मृत्यूच्या दारातून परत आला आहे.”

Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Rajasthan bureaucrat dies after botched surgery
राजस्थानच्या सहाय्यक जिल्हाधिकारी चुकीच्या शस्त्रक्रियेचा बळी? कोण होत्या प्रियांका बिश्नोई?
cyber crime
New Cyber Fraud: मोबाइलच्या किपॅडवर ‘शून्य’ दाबताच लाखोंचा गंडा; या सायबर स्कॅमपासून सावध व्हा
maharashtra bjp chief bawankule s son audi hits several vehicles in nagpur driver arrested
बावनकुळेंच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक; नागपुरातील घटना; चालकासह एकाला अटक
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
Kalyan Dombivli hawker removal chief suspended
कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित
Mumbai Road Rage Case
Mumbai road rage : मुंबईत ओला टॅक्सी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार रिषभ चक्रवर्तीला अटक, व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई

हेही वाचा- “तू सिंगल आहेस म्हणून…” सुट्टीदिवशी बॉसने कामावर यायला सांगितलं, कर्मचाऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, दोघांमधील चॅट Viral

हा व्हिडिओ २६ जून रोजी अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकातून ही एक्सप्रेस सुटली होती, यावेळी ट्रेनचा दरवाजा बंद झाला होता. दरम्यान, यावेळी सीपीआय अभिनाशने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल गेल्याने तो प्लॅटफॉर्मवर पडला. रेल्वे अधिकारी प्लॅटफॉर्मवर पडल्याची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये रेल्वे अधिकारी रेल्वे स्टेशनवर ट्रेनबरोबर चालताना दिसत आहे. यावेळी तो लोको पायलटची खिडकीही ठोठावतो आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो, याचवेळी तोल गेल्याने तो खाली पडतो. मात्र, त्याच्या शेजारी उभे असलेले लोक अधिकाऱ्याच्या मदतीसाठी धावून जातात आणि त्याला रेल्वेखाली जाण्यापासून वाचवतात.

हेही वाचा- “घरी मी एकटाच…” मदत मागणाऱ्या मुलीला पोलिसाने मध्यरात्री बोलावलं घरी, तिने नकार देताच…, दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट Viral

ट्रेनचा दरवाजा आपोआप बंद

वंदे भारत एक्स्प्रेसचे दरवाजा आपोआप बंद झाला, यावेळी ट्रेन निघाल्याचं पाहताच रेल्वे अधिकारी घाईघाईत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो आणि तो खाली पडतो. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. एकाने लिहिलं “त्याचे नशीब चांगले होते.” तर दुसऱ्याने “जाको राखे साइयां, मार सके न कोय.” अशी कमेंट केली आहे.