मीडियावर चोर आणि चोरांच्या चोरी करण्याच्या विचित्र तऱ्हा याबद्दल इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असेल, तर बातम्यांमधून माहिती घेतली असेल. काही जण चोरी करण्याआधी देवाला नमस्कार करतात, तर काही जण चोरीआधी दुकानासमोर योगा करतात… होय, योगा चोराचा हा प्रकार जरा नवीनच आहे. सध्या सोशल मीडियावर योगा करून चोरी करणाऱ्या चोराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेमके व्हिडीओमध्ये काय आहे ते पाहा.

तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर phillippasbakery नावाच्या अकाउंटने त्यांच्याच बेकरीमध्ये झालेल्या चोरीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये बेकरीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. त्या फुटेजमध्ये एक व्यक्ती संपूर्ण काळ्या रंगाचे, व्यायाम करताना घातले जाणारे कापडे घालून उभा असल्याचे आपण पाहू शकतो. नंतर लागेचच तो बेकरीसमोरच्या जमिनीवर झोपून, लोळून योगासने करू लागतो. अगदी ८ ते १० व्यायाम प्रकार करतो आणि नंतर बेकरीच्या आत जातो, असे त्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही वाचा : Video : ओरँगउटांगने घरात शिरून आधी हात धुतले, नंतर… माकडाच्या ‘या’ करमातींनी व्हाल चकित

व्हिडीओ शेअर करणाऱ्या phillippasbakery अकाउंटने व्हिडीओखाली नेमके काय घडले याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, “आम्ही सिक्युरिटी फुटेज पाहिले. मात्र, त्यात दिसणारे दृश्य पाहिल्यानंतर आम्हाला जरा आश्चर्यच वाटले. कारण एकंदरीत फुटेज पाहून चोरी करण्याआधी योगा आवश्यक आहे असे दिसते”, असे मिश्कील कॅप्शन लिहिले आहे. तसेच पुढे, “बेकरीमधील काही वस्तू चोरीला गेल्या होत्या, मात्र त्याचबरोबर थोडे क्रोसॉन्ट [croissant – पावाचा युरोपियन पदार्थ] सुद्धा चोरीला गेल्याचे आमच्या लक्षात आले. याचा अर्थ त्या व्यायाम करणाऱ्या चोरालाही क्रोसॉन्टची भुरळ पडलेली दिसते”, अशी माहिती लिहिली आहे.

इन्स्टाग्रामवर चोरीचा हा विनोदी प्रकार पाहून नेटकरी काय म्हणाले ते पाहू.

“बापरे काय मजेशीर किस्सा आहे. अर्थात, बेकरसाठी वाईट झाले…, पण त्या चोराने फारच सुंदर योगा केला आहे”, असे एकाने लिहिले आहे. “देवा.. हे कोणत्या जगात आलो आहात आपण.. योगा चोर??”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. “पाव खाण्याआधी कॅलरीज जाळणे खरंच गरजेचे असते तर…”, असे तिसऱ्याने लिहिले. “आज दिवसभरातील सर्वात विचित्र व्हिडीओ आहे हा”, अशी प्रतिक्रिया चौथ्याने दिली; तर शेवटी पाचव्याने, “बापरे… हा व्हिडीओ पाहणे थांबवूच शकत नाही. मला वाटतं या चोराने केलेल्या व्यायाम प्रकारांचा वापर मी करून पाहिला पाहिजे”, असे लिहिले आहे.

हेही वाचा : Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आत्तापर्यंत त्याला १६९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader