Tiger Viral video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. आतापर्यंत तुम्ही वाघाला एकट्यालाच पाहिलं असेल पण कधी त्याच्या कुटुंबासोबत पाहिलंय का? मग हा पाहा व्हिडीओ.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एका वाघांच्या कुटुंबाचा व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हाच व्हिडीओ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी देखील शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करताना वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्याची कॅप्शन लिहीली आहे की ‘एक प्रेमळ कुटुंब आमच्या जगाच्या कॅनव्हासवर रंग जुळवताना.’
दरम्यान या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगालत वाघ आपल्या कुटुंबासोबत निवांत दुपारची झोप घेत आहे. तर मध्ये मध्ये मस्त मातीत लोळत आहेत. वाघाच्या या कुटुंबाला पहिल्यांदाच इतकं निवांत असलेलं पाहिलं आहे. संपूर्ण वाघाची फॅमिली सावलीत मस्तपैकी आराम करीत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: आईला मुलाने दिलं इतकं भयानक गिफ्ट; बॉक्स उघडताच भीतीने थरकाप, पाहा आत काय होतं
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरीही वाघाला एवढं शांत पाहून अवाक् झाले आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, किती सुंदर, तर दुसरा म्हणतो एकाच वेळी हे सगळे कसे काय झोपले? अशा बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.