Mumbai Local Viral Video: मुंबईत काही दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. पावसानं झोडपल्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला आहे. ८ जुलै रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळित झालं होतं. लोकल फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. त्याचाप्रमाणे रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्यांवरील वाहतूकही ठप्प झाली होती. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक पावसामुळे विस्कळित झाल्याचे पाहायला मिळाले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले होते. रेल्वे रुळांमध्ये पाणी साठल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. आता अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात मुंबईची लोकल ट्रॅकवरून अगदी संथ गतीनं पुढे जाताना दिसत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधीही कसलाही व्हिडीओ व्हायरल होऊ शकतो. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजू शकेल की, तो मजेदार आहे की धक्कादायक. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या सामग्रीचे हे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. मात्र, सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सोशल मीडियावर त्यासंबंधीचे बहुतांश व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या मुंबईतील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये इतकी गर्दी असते की, लोकांना त्यामध्ये पाऊल ठेवणंही कठीण होतं. आता सोशल मीडियावर लोकांच्या गर्दीमुळे नव्हे, तर पावसामुळे लोकलची काय अवस्था झाली ते समोर आलं आहे.

(हे ही वाचा: जंगलात कार पाहताच हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी गजराज पुढे येताच लोकांच्या किंकाळ्या अन् पुढे घडलं असं की…)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?

मुंबईत जोरदार पाऊस पडला की, लोकल ट्रेनच्या रुळांमध्ये हमखास पाणी साठलेले असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पावसानंतर ट्रेनचे संपूर्ण ट्रॅक पाण्यात बुडाल्याचे दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असं दिसतं की, ट्रॅकवर इतकं पाणी आहे की, ट्रॅक दिसत नाहीयेत. त्याच पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरून मुंबईची लोकल ट्रेन धावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुंबई लोकल ट्रेनचे इंजिन आणि पहिला डबा दिसत आहे. लोको पायलट प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून संथ गतीनं ट्रेन चालवत आहे. त्यादरम्यान दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने त्या लोकलचा व्हिडीओ रेकॉर्ड केला; जो सध्या व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Madan_Chikna नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत एक लाख ७३ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं, “आपण याला वॉटर रेल म्हणू शकतो का?” दुसऱ्या युजरनं लिहिले, “वॉटर मेंट्रोच उद्घाटन.” तिसऱ्या युजरने लिहिलं, ‘पावसाळा नुकताच सुरू झाला आहे.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदविल्या आहेत.