‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ किंवा ‘डब्ल्यू डब्ल्यू एफ’ हे म्हटलं की आता विशी-तिशीत असणारे सगळे लोक नाॅस्टॅल्जियामध्ये जातात. ९० च्या दशकात ज्यांच्या घरी केबल टीव्ही असण्याचं भाग्य होतं ते सगळेजण ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ सुरू झालं की टीव्हीला चिकटून बसायचे. स्मॅकडाऊन, रेसल मेनिया, राॅयल रंबल वगैरे नावं सगळ्यांना तोंडपाठ असायची. या ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’चे पत्तेसुध्दा यायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर काॅलनीतल्या मित्रांबरोबर हे पत्ते कुटत बसण्याची मजा और होती.
प्रत्येकाचा एक-एक फेव्हरेट रेसलर असायचा. हल्क होगन, अंडरटेकर, द राॅक, स्टोन कोल्ड स्टीव्ह आॅस्टिन, हिट मॅन, शाॅन मायकल, मॅट हार्डी, कर्ट अँगल वगैरे नेहमीचे फेव्हरेट्स
याच सगळ्यांमधला एक होता तो ‘ट्रिपल एच’. रेसलिंगच्या विश्वात सुरूवातीला व्हिलनसारखा वावरणारा ट्रिपल एच पुढे तुफान लोकप्रिय झाला.
या सगळ्यांच्या कुस्त्यांसारखीच त्यांची स्टेडियममध्ये एंट्री करण्याची स्टाईलपण आवर्जून पाहिली जायची. प्रत्येकाचं स्वत:चं एक म्युझिक होतं. त्यातल्या त्यात कर्ट अँगल आणि अंडरटेकरची एंट्री मारण्याची पध्दत आजही लोकांच्या लक्षात आहे.
आता हे सगळं सांगायचं कारण काय तर पाकिस्तानमध्ये एका तरूणाने आपल्याच लग्नाच्या मंडपात ‘ट्रिपल एच’च्या म्युझिकवर एंट्री मारली. यात त्याने ट्रिपल एच चे सगळे हावभाव तसंच त्याच्या एंट्रीच्या वेळी वापरण्यात येणारे सगळे लाईट इफेक्ट्स याची जय्यत तयारी आपल्या मांडवात केली होती पहा हा धमाल व्हिडिओ शेवटपर्यंत
सौजन्य – फेसबुक
हल्ली थीम वेडिंगचा ट्रेंड आहे. त्याच ट्रेंडनुसार ‘ट्रिपल एच’च्या या डायहार्ड फॅनने त्याच्याच स्टाईलमध्ये एंट्री मारली. या तरूणाचं नाव आहे किचू आमेर. तो ‘आखाड्यात’ आल्यावर त्याचे मित्रसुध्दा ‘किचू, किचू’ म्हणत त्याला चिअर अप करत आहेत.
आपल्या रेसलिंग दैवताला थेट आपल्या लग्नमंडपातून वंदन करणाऱ्या किचू आमेरच्या या व्हिडिओची दखल खुद्द ‘ट्रिपल एच’ने घेतली.
‘लग्नच असं आहे तर हनिमून कसा असेल?’ असं ट्वीट करत ट्रिपल एच ने त्याला कोपरखळी मारली आहे.
Could only imagine what the honeymoon was like!!! https://t.co/z4ZhSwpsrF
— Triple H (@TripleH) March 6, 2017
सौजन्य- ट्विटर
हौसेला मोल नाही बाबा!