अनेक रस्ते अपघातांमध्ये माणसांशिवाय वन्य प्राणी जखमी झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. अनेक वेळा अपघातात भरधाव वाहनांची धडक बसून जनावरे गंभीर जखमी होतात. त्याचबरोबर देशात असे अनेक राष्ट्रीय महामार्ग आहेत जे जंगलातून जातात, अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना वाहनांची धडक बसल्याने मोठे अपघात होत आहेत. नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. एक गेंडा रस्त्यावर जात असताना एका ट्रकने त्याला धडक दिली. धडकेनंतर ट्रक चालकाने मागे पुढे न पाहता तिथून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माल वाहून नेणारा अवजड ट्रक रस्ता ओलांडताना दिसतो. इतक्यात प्राण्यांच्या कॉरिडॉरच्या एका बाजूने जंगली गेंडा येताना दिसतो. ट्रक येताना पाहून हा गेंडा वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात त्याला ट्रकची धडक बसते आणि तो रस्त्यावर धाडकन कोसळतो. या धडकेत गेंडा कोसळून विव्हळत असताना सुद्धा ट्रक चालक मात्र निर्दयीपणे तिथून पळ काढतो. आपल्या ट्रकच्या धडकेत गेंड्याला काही झालं तर नाही, हे जाणून घेण्याची सुद्धा त्याने तसदी घेतली नाही.
सुदैवाने या घटनेत गेंड्याचा जीव वाचला आणि तो पुन्हा कसंबसं उभा राहून पुन्हा जंगलात जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण ट्रकची धडक इतकी जबरदस्त बसली होती की तो पुन्हा कोसळू लागला. पण पुन्हा त्याने स्वःला सावरत जंगलात गेला. हा व्हिडिओ IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनीही शेअर केला आहे. ‘मित्रांनो, प्राण्यांच्या कॉरिडॉरमधून जाताना आपण किमान खबरदारी तरी घेऊ शकतो.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सुद्धा रविवारी हा व्हिडीओ शेअर केला.
हा व्हिडीओ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान परिसरातील राष्ट्रीय महामार्ग-37 चा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित ट्रक चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. तसंच अशा घटनांमध्ये जनावरांचे प्राण वाचवता यावेत यासाठी 32 किमी एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम सुरू असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं आहे.
आखणी वाचा : बुडत्या टायटॅनिक सारखं दिसणारं बाऊन्सी हाऊस पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सिंहाच्या छाव्याला ओंजारत गोंजारत होता, मग काय पुढे जे केलं त्यामुळे जन्माची अद्दल घडली!
हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काहींनी जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केलीय. तर काहींनी या घटनेत ट्रक चालकाची काहीही चूक नसल्याचं सांगितलं आहे. एका यूजरने लिहिले की, ‘अधिकार्यांनी गेंड्यांना शोधून उपचार केले का, गेंडा ठीक आहे का? त्याला शोधण्यासाठी वनाधिकारी प्रयत्न करतील, अशी आशा आहे.