Viral Video : मैत्री हे नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. मित्रांमध्ये रुसवा फुगवी असते, पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. कधी ते भांडतात पण वेळ आली की एकमेकांसाठी लढायलाही मागे पुढे पाहत नाही. जेव्हा जेव्हा आयुष्यात आपण एकटे पडतो तेव्हा मित्र कायम आपल्या बरोबर असतात. लहानपणीची मैत्री तर अत्यंत खास असते. आपण आयुष्यात कुठेही असलो तरी ही मैत्री विसरता येत नाही. सोशल मीडियावर मैत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री नरहरी झिरवळ दिसत आहे. ते एकटे नाही तर ते त्यांच्या मित्राबरोबर आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मंत्री नरहरी झिरवळ दिसेल. ते त्यांच्या एका मित्राच्या गळ्यात हात टाकून त्याला दोन पायलट जवळ घेऊन जातात आणि त्या मित्राची आणि पायलटची भेट करून देतात. त्यानंतर दोन पायलट सह झिरवळ आणि त्यांचा मित्र फोटो काढतात. या संपूर्ण व्हिडीओमध्ये झिरवळ त्यांच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून असतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. त्यांचा हा मित्र असल्याचा दावा या व्हिडीओद्वारे केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “मी किती मोठा झालो तरी मित्रा तुला विसरणार नाही..माननीय कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब”
पाहा व्हायरल व्हिडीओ
agnipankh_academy_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजही माणूसकी जीवंत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा..” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमच्या मैत्रीला सलाम पण त्या ही पेक्षा त्या आजोबानी हातात हात देताना काढलेली पायातील चप्पल हे फक्त माणुसकी जपलेला शेतकरीचं करू शकतो.. मनापासून धन्यवाद” एक युजर लिहितो, “मित्र मित्रच असतो” तर दुसरा युजर लिहितो, “झिरवळ साहेब मातीला नाळ जोडलेला माणूस” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.