Viral Video : मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असलेले हे नातं अतिशय अनमोल असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी असते. विचारांची तार जुळली की मैत्री ही हवीहवीशी वाटते. आयुष्यात कोणतेही संकट येऊ द्या, खरे मित्र नेहमी धावून येतात. खरं तर चांगले मित्र लाभणे, हा नशीबाचा एक भाग असतो. अनेकदा मैत्रीमध्ये गैरसमज होतात. या गैरसमजामुळे चांगल्या मैत्रीमध्ये दुरावा दिसून येतो. एकेकाळी चांगली मैत्री निभवणारे मित्र मैत्रीणी एकमेकांबरोबर बोलत सुद्धा नाही. या दरम्यान दोघांनाही त्रास होतो. त्यामुळे मैत्रीमध्ये कधीही गैरसमज नसावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मैत्रीणी भांडण मिटल्यावर ढसा ढसा रडताना दिसत आहे आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या (Two Friends Cry After Making Up)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुणी दिसेल. या तरुणी एका खोलीतून बाहेर पडतात. त्यानंतर त्या भावुक होताना दिसतात आणि एमकेकांकडे पाहून रडताना दिसतात. या दोघी खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. पुढे एक मैत्रीण पुढे येऊन दुसऱ्या मैत्रीणीला घट्ट मिठी मारते आणि दोघीही एकमेकींच्या मिठीत ढसा ढसा रडताना दिसतात. त्यांना पाहून इतर आजुबाजूला उभे असलेले लोक भावुक होतात. त्यानंतर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रीणीचे अश्रु पुसते आणि तिला रडू नको असं समजावून सांगते. या व्हिडीओवर लिहिलेय, “दोन जिवलग मैत्रीणी खूप दिवस बोलत नव्हत्या. क्षणात भांडण मिटले आणि दोघी किती रडल्या. अबोला मिटवण्याचं मला भाग्य लाभलं”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral video)

anantraut11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लेखक, कवी,वक्ता अनंत राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप दिवसांचं भांडण मिटलं.
म्हणून गैरसमज नसावे मित्रांनो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोण म्हणतं त्रास फक्त प्रेमातच होतो. एकदा मनापासून मैत्री करून बघा.. प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो…” तर एका युजरने लिहिलेय, “खऱ्या अर्थाने जगाला मैत्री समजवणारे कवी. अतिशय भावनिक क्षण आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “नातं कोणतंही असो मनातून निभावलं तर त्रास होतोच” एक युजर लिहितो, “खरच अंगावर काटा आला” अनेक युजर्सनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काहींनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.