शाळेची सगळी वर्ष आपण मित्र-मैत्रिणींबरोबर मिळून हसण्यात, खेळण्यात, अभ्यास करण्यात घालवत असतो. तेव्हा जेवायला सगळे एकत्र बसून एकमेकांचे डबे खाणे, अभ्यास करणे, एकमेकांच्या खोड्या काढणे; तर कधीकधी उगाच शिक्षकांकडे एखाद्याची तक्रार करणे यांसारख्या कितीतरी आठवणी प्रत्येकाकडे असतील. अशा चांगल्या आठवणींबरोबर आपल्या अगदी जवळच्या मित्राबरोबर एखादे भांडण झाले तर आपण अबोला धरायचो; एकमेकांवर आरडा-ओरडा करून शाब्दिक बाचाबाची कारण्यासारखेही किस्से अनेकांकडे असतील.
मात्र, सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडीओत दोन विद्यार्थी कोणत्यातरी कारणावरून एकमेकांना बेदम मारताना दिसत आहेत. एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमातून @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून हा भांडणाचा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओला “शाळेतल्या मैत्रिणींसमोर मला का चिडवले”, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे नेमके समजत नाही.
व्हिडीओमध्ये दोन तरुण विद्यार्थी लाल रंगाचा स्वेटर आणि क्रीम रंगाचा शर्ट आणि निळसर-काळ्या रंगाची पँट अशा गणवेशात दिसत आहेत. सुरुवातीला दोघांमध्ये कदाचित कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची सुरू असावी. मात्र, त्यानंतर त्या दोघांमधील एकाने दुसऱ्याच्या कानशिलात लगावली आणि नंतर पुढे दोघेही एकमेकांना चापट्या, बुक्के आणि कानाखाली मारत असल्याचे शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. शेवटी त्यांची ही मारामारी थांबवण्यासाठी बाजूला उभा असलेला एका विद्यार्थी दोघांच्यामध्ये पडून त्यांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही आपल्याला दिसते.
मात्र, व्हिडीओत दिसणाऱ्या या मारामारीच्या प्रकरणानंतर अनेक पालक शाळेच्या वातावरणाबद्दल काळजी करू शकतात. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची हातापायी आणि भांडणे होत असल्यास अनेक पालकांना नक्कीच त्यांच्या मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटू शकते. हा व्हिडीओ सर्वप्रथम इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर शेअर करण्यात आला होता. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १४०k इतके व्ह्यूज मिळाले आहेत.