सोशल मीडियावर महिला गाडी चालवताना ज्या काही चुका करतात त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं. त्यावरती अनेक वेगवेगळी मीम्स बनवली जातात. शिवाय, ‘पापा की परी’ ‘द वुमन’ असे अनेक कॅप्शन त्यासाठी सतत ट्रेंडिंगमध्ये असतात. शिवाय याला प्रत्युत्तर म्हणून महिला वर्गाकडूनही पुरुषांना ट्रोल करता येतील असे काही व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट केले जातात. तेही खूप मजेशीर असतात. अशातच आता दोन महिला पेट्रोल पंपावर आपली कार घेऊन गेल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तुम्ही म्हणाल कार पेट्रोल पंपावर घेऊन जाणं तर सामान्य बाब आहे. पण तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो व्हायरल होण्यामागचं कारण समजणार आहे. आजकाल अनेकजण पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन वापरणं पसंत करतात. इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या टेस्ला कंपनीला जगभरातील लोक ओळखतात. सध्या याच कारबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत.
हा कारण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला पेट्रोल पंपावर टेस्ला कार घेऊन गेल्याचं दिसत आहेत. शिवाय त्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी कारच्या पेट्रोलच्या टाकी शोधताना दिसत आहेत. या महिला पेट्रोल टाकण्यासाठी कारला कुठे झाकणं आहे हे शोधत असतानाच. तिथे उपस्थित एका व्यक्तीने त्यांचे हे कृत्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केले. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरण कठिण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यातील ‘तो’ फोटो व्हायरल होताच प्रवाशांनी व्यक्त केला संताप
टेस्लामध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर –
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर sorkartanvir19 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला टेस्ला कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जागा शोधताना दिसत आहेत. जे पाहून नेटकऱ्यांना आपलं हसू आवरणं कठिण झालं आहे. कारण टेस्ला ही इलेक्ट्रॉनिक कार आहे, जी पेट्रोलवर नाही तर विजेवर चालते.
व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ –
या महिलांना पाहून प्रत्येकजण त्यांच्या या कृतीवर हसताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो ५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर त्याला ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत.