Viral Video : आपल्या देशात असे अनेक तरुण मंडळी आहे जे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न बघतात. असंख्य तरुण मंडळी यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. काही तरुणांच्या पदरी मेहनत करूनही अपयश येतं. लाखोपैकी काही मोजके विद्यार्थी असतात जे या परीक्षेत पास होतात. अशाच एका कोल्हापुरातल्या एक मेंढपाळाच्या पोराने यश मिळवले आहे. या तरुणाने ५५१ रँक पटवून आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. हजारो लोकांना प्रेरणा देणाऱ्या बिरदेव डोणेने अशक्यही शक्य करून दाखवलं. सध्या सगळीकडे बिरदेवची चांगलीच चर्चा सुरू आहे.

“माणसाने कितीही मोठं झालं तरी आपल्या परिस्थितीची…”

सध्या सोशल मीडियावर बिरदेवचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे अशाच एका व्हिडीओमध्ये बिरदेव एक लाखमोलाची गोष्ट बोलतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बिरदेव सांगतो की माणसाला परिस्थितीची जाण असायला हवी.

बिरदेव म्हणतो, “कोर्टात वैगरं कसं आहे, भगवत् गीता ठेवतात की खरं बोलणार, खोटं सांगणार नाही. तसं आमच्या धनगर समाजाच्या बाबतीच असं आहे की भंडारावर हात ठेवून खरं सांगणार. भंडारावर हात ठेवला की कोणी खोटं बोलणार नाही. मग एक होतं की तेच की सांगायचा उद्देश हाच की माणसाने कितीही मोठं झालं तरी आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे..” बिरदेवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

rushikesh_sargar_vlogs1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भंडारा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादा सगळ्या धनगर बांधवांसाठी आदर्श ठरला” तर एका युजरने लिहिलेय, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्यायला, तो गर्जना केल्याशिवाय राहू शकत नाही हे आज आपण IPS होऊन सिद्ध करून दाखवले दादा आणि सलाम तुझ्या प्रवासाला..जय भिम जय मल्हार” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज महाराष्ट्रात एकच चर्चा धनगराचं पोरगं साहेब झाला, ते पण आयपीएस अधिकारी” एक युजर लिहितो, “भाऊ IPS झाला तरी जातीला, मातीला कधी विसरला नाही. महाराज मल्हार होळकरचा संघर्ष आत्मसात करून शुन्यातून स्वराज्य निर्माण केले तु धनगराचा इतिहास पुन्हा लिहला एक मेंढ्यावाल्याचं पोरगं काय करू शकतो.. जय आहिल्यामाता जय मल्हार” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.