इंडोनेशिया येथील माउंट रुआंग ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना काल, म्हणजेच मंगळवारी ३० एप्रिलला घडली असल्याचे व्हिडीओ शेअर झालेल्या तारखेवरून समजते. ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची ही घटना दोन आठवड्यात दुसऱ्यांदा घडली असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखानुसार समजते. तसेच या उद्रेकामुळे धूळ, कचरा साधारण दोन किलोमीटर लांबवर उडून, जवळ असणारे विमानतळदेखील बंद करण्यात आले होते.
सुलावेसी बेटावर असलेल्या या ज्वालामुखीच्या अलीकडच्या एकंदरीत घडामोडींकडे पाहता, ज्वालामुखीसंबंधी सतर्कता पातळी वाढविण्यात आली असल्याची माहितीदेखील द इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार समजते.
हेही वाचा : Video : इंटरनेटवर व्हायरल होतोय ‘चॉकलेट चीज वडापाव’! हैराण नेटकरी म्हणतात, “…वडापावचा सत्यानाश!”
तेथील अधिकाऱ्यांनी बेटावर राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना, तसेच तिथे येणाऱ्या गिर्यारोहकांना ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या ठिकाणापासून किमान सहा किलोमीटर अंतर दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक सोशल मीडिया माध्यमांवरून या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरील volcaholic1 नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये नेमके काय दिसते पाहू.
या व्हिडीओमध्ये आपल्याला समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर काही होड्या दिसत आहेत. मात्र, समुद्राच्या मध्यभागी प्रचंड प्रमाणात धूळ आणि करड्या-पांढऱ्या रंगाच्या धुराचा जाड थर असल्याचे आपण पाहू शकतो. हा थर इतका जाड आहे की, आजूबाजूचे काहीही त्यामधून आपल्याला पाहता येत नाही. व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य पाहून कुणाच्याही छातीत धडकी भरेल. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहू.
“भयंकर! सगळे नागरिक सुखरूप असतील अशी अशा आहे”, असे एकाने लिहिले आहे.
“कृपया सर्वांनी आपली काळजी घ्या”, असे दुसऱ्याने म्हटले आहे.
“इंडो पॅसिफिकच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो”, असे तिसऱ्याने लिहिले आहे.
“अजून काही लाखो टनांचा Co२ हवेत मिसळला आहे आणि यावर सरकार तुम्हाला टॅक्सदेखील लावू शकत नाही”, असे चौथ्याने लिहिले आहे.
व्हिडिओ पाहा :
एक्सवरील volcaholic1 नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १९९.२K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.