Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराला प्रचंड मोठा इतिहास लाभलेला आहे. या शहराचा इतिहास आणि संस्कृती या शहराची ओळख सांगतो. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले तसेच खाद्यपदार्थ लोकप्रिय आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता आयटी हब झालं आहे. शिक्षण, नोकरीसाठी दरवर्षी हजारो लोक येथे येतात. काही लोकांना पुणे एवढं आवडतं की येथेच स्थायिक होतात.

असं म्हणतात, पुण्यात एक वेगळी जादू आहे. जो कोणी पुण्यात येतो, तो पुण्याच्या प्रेमात पडतो. तुम्हालाही पुणे शहर खूप आवडते का? आज आपण लोकांना पुणे का आवडतं? याविषयी जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकांना पुणे का आवडतं, याविषयी सांगितले आहे.

लोकांना पुणे का आवडतं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये लोकांना पुणे का आवडतं यामागील कारण सांगितलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दगडूशेठ हलवाई गणपती दिसेल. तिथे लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यानंतर पुढे व्हिडीओत पुण्याची मेट्रो दिसत आहे. त्यानंतर व्हिडीओत शनिवारवाडा हे ऐतिहासिक ठिकाण दिसत आहे. पुढे व्हिडीओत पुण्यातील पीएमटी बस दाखवली आहे. त्यानंतर पुण्यातील सर्वात लोकप्रिय असा एफसी रोड दाखवला आहे. पुण्यातील लोकप्रिय पदार्थ मिसळ दाखवली आहे. शेवटी पुण्यातील सुंदर आणि नयनरम्य असा जे एम दाखवला आहे. व्हिडीओत दाखवलेली ठिकाणे, गोष्टी हे या शहराची ओळख आहे. दगडूशेठ गणपती असो किंवा शनिवारवाडा, पीएमटी बस असो पुण्यातील मेट्रो, एफ रोडवर फिरायला जाणे असो किंवा मिसळ खाणे असो, पुण्यातील प्रत्येक गोष्ट हवहवीशी वाटते आणि त्यामुळे लोकांना पुणे खूप आवडतं.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

puneri_prem या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”पुणे एवढं का आवडते, कारण..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कारण इथं माझ्यावर प्रेम करणारे विश्वासू लोक खूप आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पुण्यात आल्यावर कोणीही पुण्याच्या प्रेमात पडू शकते” अनेक युजर्सनी कमेंटमध्ये ‘आय लव्ह पुणे’ लिहिलेय.

Story img Loader